नागपूर,
eknath-shinde-birsa-munda-jayanti भगवान बिरसा मुंडा यांची जयंती केवळ त्यांच्या छायाचित्राला हार अर्पण करून साजरी करणे पुरेसे नाही, तर त्यांच्या विचारांना अनुसरून आदिवासी समाजाच्या जीवनात विकास आणि परिवर्तन घडवून आणण्यासाठी प्रत्यक्ष काम करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी ठोस प्रयत्न करणे, त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणणे आणि त्यांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडवून आणणे, हीच बिरसा मुंडा यांना खरी आदरांजली ठरेल, असे शिंदे यांनी नमूद केले.
देशाच्या सर्वोच्च राष्ट्रपतीपदावर आदिवासी समाजातील द्रौपदी मुर्मू विराजमान झाल्या आहेत, ही अभिमानाची बाब आहे. आदिवासी समाजाला देशाच्या सर्वोच्च घटनात्मक पदावर प्रतिनिधित्वाची संधी मिळाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही मी अभिनंदन करतो, असे एकनाथ शिंदे म्हणाले.
बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या कार्याचे स्मरण करण्याबरोबरच आदिवासी बांधवांच्या विकासासाठी कटिबद्ध राहण्याचा संदेशही त्यांनी यावेळी दिला.