शेतकर्‍यांना 50 हजारांचे प्रोत्साहन अनुदान कधी?

जाणून घ्या नवा अपडेट...

    दिनांक :15-Nov-2026
Total Views |

मुंबई,
Farmer Loan Waiverराज्यातील शेतकर्‍यांसाठी अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर झाली. त्यातंर्गत राज्यातील 20 लाख 70 हजार शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाला. 18 हजार कोटींची कर्जमाफी देण्यात आली. अजूनही कर्जमाफीची प्रक्रिया वेगाने सुरू आहे. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांचे प्रोत्साहन अनुदान देण्याचे अभिवचनही सरकारने दिले आहे. पण पाच महिने उलटूनही आदर्श शेतकऱ्यांना त्याचा फायदा मिळालेला नाही
 

farmer 50000 
 
प्राप्त माहितीनुसार, प्रोत्साहन अनुदानाची प्रक्रिया ऑनलाईन आणि पोर्टलच्या माध्यमातून राबवण्यात येत आहे. शेतकऱ्यांच्या बँक खात्याची माहिती, आधार संलग्नता आणि कर्ज खात्याचा तपशील यामध्ये तांत्रिक अडचणी आणि त्रुटी समोर आल्या आहेत. यामुळे अर्ज छाननी प्रक्रियेला, पडताळणी प्रक्रियेला उशीर होत आहे. अनेक ठिकाणी बँकांकडून डेटा अपलोड करण्याचे काम रेंगाळले आहे. निकषांची पूर्तता करण्यात उशीर होत असल्याने प्रोत्साहन अनुदानाला ही उशीर होत आहे.
 
कर्जमाफीसोबतच नियमीतपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही राज्य सरकारने प्रोत्साहनपर अनुदान देण्याचे जाहीर केले आहे. पात्र शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांपर्यंतचे प्रोत्साहन अनुदान मिळणार आहे. राज्यातील अंदाजे 22 ते 25 लाख नियमित कर्जदार शेतकरी या प्रोत्साहनपर अनुदानासाठी पात्र ठरण्याचा अंदाज आहे. पण त्यासाठी सरकारला अजून मोठ्या निधीची गरज आणि तरतूद करावी लागणार आहे. दुष्काळी मदत अजून यायची आहे. केंद्राकडून येणाऱ्या अनुदानाची प्रतिक्षा आहे. या सर्व गोळाबेरीजमध्ये प्रोत्साहनपर अनुदानासाठी शेतकऱ्यांना अजून मोठी प्रतिक्षा करावी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.