मुंबई,
gold-price-prediction२०२७सोन्याच्या दराबाबत अनेकांना उत्सुकता असते. मागील काही महिन्यात सोन्याच्या दरात मोठी घट झाली आहे. यंदाचे २०२६ वर्ष संपण्यास आता काही दिवसांचा अवधी राहिला आहे. त्यातून आता भविष्यात सोन्याचा दर काय असेल, याची उत्सुकता अनेकांना लागली आहे. या कुतूहलाच्या पार्श्वभूमीवर, २०२७ सालाबाबत एक अनोखी भविष्यवाणी सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. काही पोस्ट्समध्ये असा दावा केला जात आहे की, बल्गेरियन भविष्यवेत्ता बाबा वंगा यांनी २०२७ पर्यंत सोन्याच्या किमतीत मोठी वाढ होईल, असे भाकीत केले होते. दरम्यान, अनेक वित्तीय संस्थांनीही भविष्यात सोन्याच्या किमती वाढण्याचा अंदाज वर्तवला आहे.
भारत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याच्या किमती सतत बदलत असतात. त्यामुळे गुंतवणूकदारांपासून ते दागिने खरेदी करणाऱ्यांपर्यंत सर्वजण सोन्याच्या दरांवर बारीक लक्ष ठेवून असतात. अशा परिस्थितीत, सोशल मीडियावर एक पोस्ट समोर आली आहे, ज्यामध्ये दावा केला आहे की बाबा वंगा यांनी २०२७ पर्यंत सोन्याच्या किमतीत मोठी वाढ होईल असे सांगितले होते.
या दाव्यानुसार, जर जागतिक आर्थिक संकट किंवा रोख रकमेची तीव्र टंचाई निर्माण झाली, तर लोकांचा पारंपारिक बँकिंग प्रणालीवरील विश्वास कमी होऊ शकतो. अशा परिस्थितीत, गुंतवणूकदार सोन्याकडे वळू शकतात. असेही म्हटले जात आहे की, अशा परिस्थितीत सोन्याच्या किमतीत २५ ते ४० टक्क्यांपर्यंत वाढ होऊ शकते.
मात्र, हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की, बाबा वंगा यांनी खरोखरच अशी भविष्यवाणी केली होती, याचा कोणताही अधिकृत पुरावा उपलब्ध नाही. त्यांच्या कथित भविष्यवाण्यांची कोणतीही विश्वासार्ह लेखी नोंद नाही. त्यांच्या नावावर सांगितल्या जाणाऱ्या अनेक भविष्यवाण्यांबाबत दावे केले जातात.
वेगवेगळ्या रिपोर्टनुसार, बातम्यांनुसार २०२७ पर्यंत भारतात २४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम २.६२ लाख ते २.८२ लाख रुपयांपर्यंत पोहोचू शकतो. तर, एका अन्य अंदाजानुसार हा भाव प्रति १० ग्रॅम सुमारे २.१ लाख रुपये असू शकतो. हे आकडे बाबा वंगा यांच्या कथित भविष्यवाण्यांशी जोडलेले आहेत आणि त्यांना अधिकृत बाजार अंदाज मानण्याऐवजी केवळ एक शक्यता किंवा तर्क म्हणून पाहिले पाहिजे.