लातूरमध्ये भीषण अपघाताची घटना

कारच्या धडकेत दुचाकीवरील दोघांचा मृत्यू

    दिनांक :15-Nov-2026
Total Views |
 

लातूर,
latur-taka-pati-road-accidentराज्यातील रस्ते अपघाताच्या घटना सातत्याने समोर येत असून पुन्हा एकदा लातूर जिल्ह्यात भीषण अपघाताची घटना घडली. जिल्ह्यातील टाका पाटीजवळ कार, दुचाकी आणि टेम्पोचा भीषण अपघात झाला असून या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला असून तीन ते चार जण गंभीर जखमी असल्याची प्राथमिक माहिती आहे. अपघातानंतर स्थानिकांनी, तसेच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.
 

latur accident  
 
लातूर जिल्ह्यातील टाका पाटीजवळ कार, दुचाकी आणि टेम्पो यांच्यात भीषण अपघात झाला. तुळजापूरहून औसाकडे जात असताना भरधाव कारने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील तायप्पा दिगंबर बंडगर आणि ओंकार गोपाळ बंडगर या दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर तीन ते चार जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर दोन्ही गाड्या रस्त्याच्या कडेला पडल्या असून चारचाकी कारचा पुढील भाग भुगा झाल्याचं दिसून येत आहे. त्यावरुन, अपघाताच्या तीव्रतेचा अंदाज बांधता येऊ शकतो.
 
दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच पोलीस पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर, जखमींना जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या भीषण अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून रस्ते अपघाताची समस्या गंभीर होत असल्याचीही चर्चा नागरिकांमध्ये होतेय.