राज्यभर FDA ची धडक कारवाई!

१.९० कोटींचा साठा जप्त

    दिनांक :15-Nov-2026
Total Views |
मुंबई,
maharashtra-fda-1-90-crore-seizureअन्न आणि औषध प्रशासनाने (एफडीए) राज्यभरात राबवलेल्या विशेष मोहिमेत हेल्थ सप्लिमेंट तसेच गुटखा आणि सुगंधित तंबाखूसह १ कोटी ९० लाख रुपये मूल्याचे अन्नपदार्थ जप्त केले आहेत. मुंबईतील दहिसर, धारावी, गोरेगाव आणि अँटॉप हिल परिसरातील सहा पानटपऱ्यांवरून ३१ हजार १४९ रुपयांचा प्रतिबंधित माल हस्तगत करण्यात आला असून राज्यभरात अन्न सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा
 

FDA 
 
बडगा उगारण्यात आला आहे. एफडीएने १३ नोव्हेंबरला राज्यभरातील उत्पादक, वितरक आणि विक्रेत्यांच्या आस्थापनांवर केलेल्या तपासणी मोहिमेत १ कोटी ३८ लाख रुपये मूल्याचे आरोग्य पूरक आहार आणि न्यूट्रॅस्युटिकल्स जप्त केले. विशेष आहारासाठी तयार करण्यात आलेल्या या खाद्यपदार्थांमध्ये मॅग्नेशियम अॅसिटाईल तौरेंट आणि निकोटिनामाइड मोनोन्युक्लियोटाइड या घटकांचा समावेश असल्याचे निदर्शनाला आले. अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरणाने या घटकांच्या उत्पादन मंजुरीसाठी केलेले अर्ज या आधीच फेटाळले होते.
 
ही धडक कारवाई पुणे, नाशिक, कोकण, नागपूर, अमरावती आणि छत्रपती संभाजीनगर या सहा विभागांमध्ये राबवण्यात आली. यामध्ये नागपूर विभागात ५७ लाख ३० हजार रुपयांचा सर्वाधिक साठा जप्त करण्यात आला, तर कोकणात ४७ लाख ६५ हजार रुपये आणि पुण्यात ३० लाख ५७ हजार रुपयांचा साठा जप्त करण्यात आला. उत्पादकांनी आवश्यक उत्पादन मंजुरी न घेताच या सप्लिमेंट्सचे उत्पादन केल्याचे आणि काही विक्रेत्यांनी परवान्यात अन्न श्रेणीचा समावेश न करताच विक्री केल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.