विहीर खोदताना मोठी दुर्घटना : चार मजूर ढिगाऱ्याखाली

    दिनांक :15-Nov-2026
Total Views |
पंढरपूर
Major Accident in Pandharpur
पंढरपूरमध्ये विहीर खोदण्याचे काम सुरू असताना मोठी दुर्घटना घडली आहे. विहिरीचे खोदकाम सुरू असतानाच अचानक दगडांचा मोठा ढिगारा कोसळल्याने ४ कामगार त्याखाली अडकल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.




मिळालेल्या माहितीनुसार, विहिरीच्या खोदकामादरम्यान अचानक दगडांचा ढिगारा कोसळला. त्यामुळे कामावर असलेल्या काही कामगारांना बाहेर पडण्याची संधी मिळाली नाही आणि ते ढिगाऱ्याखाली अडकल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच परिसरात चिंता व्यक्त केली जात असून, अडकलेल्या कामगारांच्या बचावकार्याबाबत अधिक माहिती समोर येण्याची प्रतीक्षा आहे. या दुर्घटनेत नेमके किती कामगार अडकले आहेत, तसेच त्यांच्या प्रकृतीबाबत अद्याप सविस्तर माहिती उपलब्ध झालेली नाही.