नाशिकमध्ये फटाक्यांमुळे शाळेच्या आवारात आगीचा भडका!

    दिनांक :15-Nov-2026
Total Views |
नाशिक,
nashik-satpur-school-fireनाशिकच्या सातपूर परिसरात शनिवारी (१४ नोव्हेंबर) मध्यरात्री फटाक्यांच्या आतषबाजीमुळे महापालिकेच्या शाळेच्या आवारात भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत शाळेतील साहित्य जळून खाक झाले असून परिसरात एकच खळबळ उडाली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
 

nashik school fire 
सातपूर येथील नाशिक महानगरपालिकेच्या शाळा क्रमांक २६ (मराठी), ३० (हिंदी) आणि ३१ (उर्दू) यांच्या आवारात ही आग लागली. शनिवारी मध्यरात्री फटाक्यांची आतषबाजी सुरू असताना त्यातून आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. आगीने काही वेळातच शाळेच्या आवारातील साहित्याला वेढा घातला. त्यामुळे शालेय साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन जवानांनी प्रयत्नांची शर्थ करत आगीवर नियंत्रण मिळवले. मध्यरात्रीची वेळ असल्याने शाळेत विद्यार्थी किंवा कर्मचारी उपस्थित नव्हते. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. दरम्यान, आगीचे नेमके कारण आणि नुकसानीचा तपशील समोर येणे बाकी आहे.