खुनाच्या गुन्ह्यातील ६ आरोपींना दोन तासांत अटक

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

    दिनांक :15-Nov-2026
Total Views |

पुलगाव,
wardha-sonora-murder-caseसोनोरा येथे तरुणाचा खून करून पसार झालेल्या ६ आरोपींना पुलगाव पोलिसांनी अवघ्या २ तासांत अटक केली आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली. गौरव राजू मांढरे (२१) रा. सोनोरा असे मृतकाचे नाव आहे तर अमन भरणे (२२), रोहित नारनवरे (२१), प्रेम बोंडाले (१९) सर्व रा. सोनोरा ढोक, त्रिशूल बावणे रा. भाईपूर पुनर्वसन तालुका आर्वी अशी आरोपींची नावे असून यांच्यासह आरोपींमध्ये दोन अल्पवयीन मुलांचाही समावेश आहे.
 

murder 
गौरव मांढरे आणि आरोपी हे मित्र असून त्यांच्यात काही दिवसांपूर्वी शाब्दिक वाद झाला होता. या वादाचा वचपा काढण्यासाठी आरोपींनी गौरवचा काटा काढण्याचा बेत आखला. दरम्यान, १४ रोजी दुपारच्या सुमारास आरोपींनी नंदकिशोर चंदेल यांच्या हॉटेलसमोर धारदार चाकूने वार करून गौरवचा खून केला. घटनेची माहिती मिळताच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपी वर्धेजवळ असल्याची माहिती मिळाली. माहितीच्या आधारे पोलिस निरीक्षक सदाशिव ढाकणे यांनी गुन्हे शोध पथक रवाना केले. गोपनीय माहिती व तांत्रिक विश्लेषणावरून आरोपींची नावे निष्पन्न करण्यात आली. आरोपी हे वर्धेजवळ असल्याची माहिती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला माहिती देण्यात आली. पथकाने ६ आरोपींना ताब्यात घेऊन पुलगाव पोलिसांकडे सुपूर्द केले.
ही कारवाई पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, उपविभागीय पोलिस अधिकारी सुशीलकुमार नायक यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विनोद चौधरी, पुलगावचे पोलिस निरीक्षक सदाशिव ढाकणे यांच्या निर्देशनात कुणाल हिवसे, राजू वैद्य, संदीप बोरबन, अमोल आडे, सोमेश गंथाडे, सत्यप्रकाश काकन, गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक आशिष ठाकूर, पोलिस उपनिरीक्षक शिवकुमार बानोत, पोलिस उपनिरीक्षक विजय गोमलाडू यांच्या नेतृत्वातील शेखर डोंगरे, नरेश पाराशर, शुभम राऊत, सुगम चौधरी, अभिषेक नाईक, हर्षल सोनटक्के, रामेश्वर नागरे यांनी केली.