‘त्या’ वाहक आणि चालकाचे परिवहन मंत्र्यांकडून निलंबन!

प्रवाशी नाहीत म्हणून गंतव्य स्थळी न जाता विद्यार्थिनींना भर रस्त्यात उतरविणे भाेवले

    दिनांक :16-Nov-2026
Total Views |

भंडारा,
bhandara-st-bus-driver-conductor-suspendedभंडारा आगाराच्या भंडारा ते मुंढरी या बसच्या चालक वाहकाने गाडीत गंतव्य स्थळापर्यंत पुरेसे प्रवाशी नाहित म्हणून बसमध्ये असलेल्या दाेन विद्यार्थिनींना रात्रीच्या वेळी भर रस्त्यात उतरविण्याची प्रकार १४ नाेव्हेंबर राेजी घडला हाेता. याची गंभीर दखल घेत राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज मुंबई यासाठी कारणीभूत चालक आणि वाहक अशा दाेघांच्याही निलंबनाची घाेषणा केला आहे. साेबतच चाैकशीचे आदेशही देण्यात आले आहे.
 

bud suspended 
१४ नोव्हेंबर २०२६ रोजी भंडारा आगाराच्या एम.एच.४० वाय ५००८ क्रमांकाची एसटी बस भंडारा ते मुंढरी या आपल्या नियमीत फेरीसाठी निघाली. बसमध्ये मुंढरी येथील दाेन विद्यार्थिनी प्रवास करीत हाेत्या. गाडीत दाेघींशीवाय इतर प्रवाशी नसल्याचे पाहून चालक अनिल सावरे आणि वाहक उदेभान मेश्राम यांनी त्यांना काेका येथे निर्जनस्थळी उतरवित मुंढरी येथे आपल्या गंतव्यस्थळी न जाता, परत भंडाऱ्याला जाण्याचा प्रयत्न केला. रात्रीच्या वेळी मुलींना उतरवून परत जाण्याचा हा प्रकार काही लाेकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी याला विराेध केला. जिल्हा परिषदेचे सभापती नरेश ईश्वरकर यांनीही वाहक व चालकाला धारेवर धरुन मुंढरीपर्यंत मुलींना साेडण्यास बाध्य केले. मात्र अशा प्रकारे साेडून जाण्याचा हा प्रकार अत्यंत धाेकादायक आणि घृणास्पद असल्याने या संदर्भातील वृत्त सर्वत्र प्रकाशित झाले.
याची दखल घेत एसटी प्रशासनाने तातडीने प्राथमिक चौकशी केली. भंडारा विभाग नियंत्रक आणि आगार व्यवस्थापक यांच्यामार्फत चौकशी करून संबंधित चालक अनिल सावरे आणि वाहक उदेभान मेश्राम यांची जबाबदारी निश्चित करण्यात आली. त्यानुसार दोघांनाही दि. १६ नोव्हेंबर २०२६ पासून एसटी सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. याची घाेषणा राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मुंबई येथे केली. साेबतच एसटीच्या शिस्त व आवेदन कार्यपद्धतीनुसार त्यांच्या विरुद्ध पुढील कारवाई सुरू करण्यात
येणार असल्याचे सांगितले. या प्रकरणाची पुनरावृत्ती भविष्यात होऊ नये, शाळेतील विद्यार्थ्यांना त्यांच्या घरापर्यंत सुखरूप पोहोचवण्याची जबाबदारी एसटीची आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांनी आपल्या मुलाप्रमाणे त्यांचा सांभाळ करावा, अशा सूचना मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिल्या समजते. कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. सध्या निलंबित केले आहे. या पुढे असा प्रकार घडला तर संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या कारवाईतून दिला आहे....