मंगरूळनाथ,
Diwali Ration Kits दुष्काळाच्या संकटात गरजू कुटुंबांची दिवाळी आनंदात साजरी व्हावी, या सामाजिक भावनेतून शिवसेनेच्या वतीने प्रभाग क्रमांक ७ मध्ये दिवाळी शिधा किटचे वितरण करण्यात आले. आमदार भावनाताई गवळी पाटील व खासदार संजय देशमुख यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे तालुकाप्रमुख तथा माजी अल्पसंख्याक शहरप्रमुख शेख नवेद यांच्या पुढाकाराने हा उपक्रम राबविण्यात आला.

दुष्काळग्रस्त शेतकरी, विधवा महिला, दिव्यांग व आर्थिकदृष्टया दुर्बल कुटुंबांना दिवाळी फराळ साहित्याच्या शिधा किटचे वितरण करण्यात आले. यावेळी शेख नवेद यांनी गरजूंच्या सुख-दुःखात सहभागी होणे हीच शिवसेनेची सामाजिक बांधिलकी असल्याचे सांगितले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनातून आणि डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून गरजू नागरिकांना मदतकार्य सुरूच राहणार असल्याचे त्यांनी नमूद केले. वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून गरजू रुग्णांना मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी, महात्मा फुले जनआरोग्य योजना व धर्मादाय रुग्णालयांद्वारे उपचार मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे सांगितले. यावेळी शहरप्रमुख मंगेश सोळंके, बजरंगसिंह रघुवंशी, बाळासाहेब देशमुख, दिनेश जाधव, रवी लांभडे, चक्रनारायण, अरुण पाटील थेर, शब्बीर भाई, शेख मुस्तकीन, श्रीकृष्ण मुंडे, मोहित ठाकूर यांच्यासह शिवसेना पदाधिकारी, युवासेना, महिला आघाडीचे पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.