राज्यभरात 'गुलाबी थंडी'ची सुखद चाहूल

    दिनांक :16-Nov-2026
Total Views |

मुंबई,
maharashtra-weatherसंपूर्ण राज्यात सध्या हवामानाचा लपंडाव सुरू आहे. एकीकडे 'गोड गुलाबी थंडी'ची सुखद चाहूल लागली असताना उत्तरेकडून थंड वारे खाली महाराष्ट्राच्या दिशेनं सरकत आहेत. तर दुसरीकडे पश्चिम बंगालच्या खाडीत कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. सोबतच बंगालच्या उपसागरात तयार होत असलेल्या 'अकबन' चक्रीवादळाचा परिणाम आता राज्यातील हवामानातही जाणवतो आहे. एकीकडे महाराष्ट्रतील बहुतांश जिल्ह्याच्या किमान तापमानात घट होत असतानाचे चित्र असताना, हवामान विभागाने 19 नोव्हेंबरच्या आसपास विदर्भात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर राज्यात पुढील 5 दिवस पावसाचा अंदाज नसला, तरी चक्रीवादळाच्या दिशेनुसार हवामानात बदल होऊ शकतो, असा अंदाज आहे.
 

maharashtra weather 
राज्यात पुणे येथे राज्यातील सर्वात कमी 12.1 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तर तिकडे, नाशिककर देखील थंडीने गारठले असून नाशकात तापमान 12.6 अंशावर पोहचले आहे. यंदा रविवारी हंगामातील आतापर्यंतच्या निचांकी 12.6 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद करण्यात आली आहे. तर उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांच्या प्रवाहामुळे देखील वातावरणात गारवा जाणवत आहे. दरम्यान, केवळ थंडी वाढली नसून, पहाटेचा कडाका आणि दुपारचे ऊन यातील तफावतीमुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण देखील निर्माण झाला आहे. गेल्या आठ दिवसांत शहराच्या किमान तापमानात 1.6 अंश सेल्सिअसची घसरण झाल्याची माहिती प्रादेशिक हवामान विभागाने दिली आहे.