संकल्प साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे प्रकाशन

    दिनांक :16-Nov-2026
Total Views |
वाशीम,
Sankalp District Marathi Literary Conference
रिसोड येथे होणार्‍या चौथ्या संकल्प जिल्हा मराठी साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे प्रकाशन पद्मश्री नामदेव कांबळे, ज्येष्ठ साहित्यिक बाबाराव मुसळे, नियोजित संमेलनाध्यक्ष डॉ. विजय जाधव यांच्या हस्ते करण्यात आले.




या संमेलनाच्या अध्यक्षपदी याआधीच सुप्रसिद्ध कथालेखक प्रा. विजय जाधव यांची निवड करण्यात आली आहे. संमेलनाध्यक्षांच्या निवडीनंतर बोधचिन्हाचे प्रकाशन करून संमेलनाच्या तयारीने आणखी वेग घेतला आहे. कार्यक्रमांची आखणीही जवळपास निश्चित झाली आहे, अशी माहिती संमेलनाचे मुख्य संयोजक चाफेश्वर गांगवे आणि डॉ. विजय काळे यांनी दिली. महाराष्ट्र शासनाचा मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ मुंबई यांच्या अनुदानातून, संकल्प फाऊंडेशन रिसोड यांच्या वतीने हे आयोजन करण्यात येणार आहे.


संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून नव्यानेच प्रा. गजानन वाघ यांची निवड करण्यात आली आली आहे. वाशीम जिल्ह्याचे शिल्पकार स्व. पुंडलीकराव गवळी साहित्य नगरी, भोमावत मंगल कार्यालय, संत श्री अमरदास बाबा संस्थान परिसर, रिसोड येथे पाच आणि सहा डिसेंबर रोजी हे संमेलन होणार आहे. यानिमित्ताने जिल्हावासीयांना एक मोठी साहित्य मेजवाणी मिळणार असून, हे संमेलन सर्वार्थाने यशस्वी व्हावे यासाठी आयोजकांचे प्रयत्न सुरू आहेत. संमेलनाविषयी काही अपेक्षा, सूचना असल्यास चाफेश्वर गांगवे ९०९६६७५००१ किंवा डॉ. विजय काळे ९८८१४२८०५६ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.