अमेरिका,
trump-republican-party-rebellionअमेरिकेतील मध्यावधीच्या निवडणुकीत रिपब्लिकन पार्टीतील खराब कामगिरी केली. अमेरिकेच्या मध्यावधीत निवडणुकीत पराभवाला सामोरे गेल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांच्या पक्षात फूट पडली आहे. निवडणुकीत पराभव झाल्यानंतर पक्षात बंडखोरी होण्यासही सुरुवात झाली आहे. रिपब्लिकन नॅशनल कमिटीचे अध्यक्ष ग्रुटर्स यांना पदावरून हटवण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. या घटनेची अमेरिकेसह जगातील राजकीय वर्तुळात चर्चा झाली आहे.
रिपब्लिकन नॅशनल कमिटीने प्रत्येक राज्यात एकूण 168 सदस्य निवडून आणले आहेत. मध्यावधीच्या निवडणुकीत खराब कामगिरीनंतरही वॉशिंग्टनमधील अनेक रिपब्लिकन नेत्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या पाठीशी उभे राहिले आहेत. तर समितीमधील नाराज सदस्यांना हटवण्याची मागणी केली जात आहे. बंडखोर गटाने थेट केंटकीच्या क्रॉस्बी यांना पांठिबा दिलाय. ते सध्या समितीच्या दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वाच्च पदावर आहेत. 3 नोव्हेंबर रोजीच्या निवडणुकीनंतर दोन दिवसांनंतर 5 नोव्हेंबर रोजी क्रॉस्बी यांनी एक पत्र लिहून एक उमेदवारी जाहीर केली. या पत्रामुळे डोनाल्ड ट्रम्प यांना मध्यावधीच्या निवडणुकीत मोठी हादरा बसला. तसेच या पत्रातून चुकांची प्रामाणिक कबुली द्यावी, अशी मागणी केली.
क्रॉस्बी हे स्वत: ट्रम्प यांच्या ‘मेक अमेरिका ग्रेट अगेन’ च्या भूमिकेचं समर्थक आहेत. परंतु विरोधक या घटनेला थेट डोनाल्ड ट्रम्प यांनाच चॅलेंज असल्याचे मानलं जात आहे. टेनेसीचे कमिटीचे सदस्य ऑस्कर ब्रॉक यांनी क्रॉस्बी यांचं समर्थन करत म्हटलं की, आमचं काम रिपब्लिकन पार्टीच्या उमेदवारांना जिंकवण्याचं होतं. फक्त एका उमेदवाराला जिंकवण्यासाठी काम करत नव्हतो. त्यांनी म्हटलं की, नेतृत्वात बदल व्हावा, अशी मागणी करण्यात आली आहे. अध्यक्ष ग्रुटर्स या निवडणुकीत चांगली कामगिरी केलेली नाही. या निवडणुकीत व्हर्जीनियाच्या सदस्य पॅट्टी लाइनमॅन यांनी म्हटलं की, टेक्सास, दक्षिण कॅरिलिना, मिसिसिपी सारख्या बालेकिल्ल्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यानंतरही जुन्या नेत्यांवरच नेतृत्वाची संधी देण्यात आली आहे.