यंदाही साधावा तुळशी विवाहाचा ‘अमृतयोग’

Tulasi-Vivah-Tarun-Bharat आली समीप घटिका

    दिनांक :16-Nov-2026
Total Views |
नागपूर, १५ नोव्हेंबर
 
Tulasi-Vivah-Tarun-Bharat 'न मे कर्मफले स्पृहा' या ब्रीदासह निष्काम कर्मभावनेने कार्यरत राहिलेल्या दैनिक तरुण भारतने शताब्दी पूर्ण केले. राष्ट्रवादी विचारांनी प्रेरित आणि लोकसेवेचे व्रत घेतलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही (RSS) शताब्दीपूर्तीचे औचित्य साधून कुटुंब प्रबोधन (Family Values), पर्यावरण संवर्धन (Environmental Protection), स्व’चा विकास (Self-awareness & Swadeshi), नागरी कर्तव्ये (Civic Duties) आणि सामाजिक समरसता (Social Harmony) अशी पंचसूत्री जाहीर केली. या सूत्रांना अनुसरून तरुण भारतने शताब्दी वर्षात ‘तुळस जगवा, पर्यावरण वाचवा’ हा व्यापक उपक्रम राबविला. तुळशीचे आध्यात्मिक, धार्मिक व पर्यावरणीय महत्त्व लक्षात घेऊन आयोजित तुळस रोपण संकल्पाला उदंड प्रतिसाद मिळाला.
 
 
 

tulasi vivah 
 
 
Tulasi-Vivah-Tarun-Bharat राष्ट्रीय बाण्याची वैचारिक परंपरा कायम ठेवतानाच तरुण भारताने घरोघरी तुळशीच्या रूपात संस्कारांची रुजवणूक केली. तुळशीचे आयुर्वेदिक उपयोग आणि धार्मिक महत्त्व वाचकांपर्यंत पोहचविण्यासाठी विशेष प्रयत्न घेतले. विदर्भाच्या सर्व जिल्ह्यांमध्ये शेकडो संस्था तरुण भारताच्या या उपक्रमात जोडल्या गेल्या. तुळशी विवाहाचे विधी नेमके कसे करायचे? हे सांगण्यासाठी तरुण भारताने संपूर्ण लग्न सोहळ्याचा व्हिडीओ बनविला आणि तो प्रसृत केला. तुळशी विवाहासाठी आवश्यक साहित्यासह सुबक-देखण्या तुळशी वृंदावन किट तयार करून गावोगावी देण्यात आल्या.
 
 
Tulasi-Vivah-Tarun-Bharat उत्साही वाचकांनी तरुण भारताच्या पुढाकारातून विदर्भ प्रांतात आठ हजारांवर सामूहिक तुळशी विवाह सोहळ्यांची दिमाखदार आयोजने केलीत.. या माध्यमातून पर्यावरण जागरूकता, नागरी सहकार्य आणि सामाजिक समरसतेचा नवा अध्याय लिहिला गेला. तरुण भारत परिवाराच्या पुढाकाराने हा विषय लोकचळवळ बनला. यंदा देखील तुळशी विवाह सोहळा आयोजनातून ही चळवळ पुढे जावी आणि संस्कार-परंपरा-पर्यावरणाचा अमृतयोग साधावा, असे आवाहन तरुण भारत परिवार करीत आहे.
 
 
Tulasi-Vivah-Tarun-Bharat आली समीप घटिका...
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि तरुण भारत वृत्तपत्राची शताब्दी तसेच, श्री नरकेसरी प्रकाशन संस्थेची अमृत महोत्सवी वर्षपूर्ती असा ‘अमृतयोग’ साधून, तरुण भारत परिवाराच्या वतीने गेले वर्षभर चाकोरीबाहेरच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यात सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला सामूहिक तुळशी विवाह सोहळा! थाटामाटात, मांडव सजवून आणि अगदी पत्रिका छापण्यापासून ते जेवणावळी घालण्यापर्यंतचे सर्व कार्यक्रम हौशीने करण्यात आले. यंदाच्या तुळशी विवाहाचे मुहूर्त येत्या शनिवार २१ नोव्हेंबरपासून सुरू होत आहेत. आपली संस्कृती जपण्याच्या दिशेने सुरू झालेली वाटचाल थांबता कामा नये. यावर्षीही तुळशी विवाह सोहळ्यांचे आवर्जून आयोजन करा आणि पर्यावरण संरक्षण आणि संस्कृती रक्षणासाठी योगदान द्या, ही हक्काची आग्रही विनंती! चला तर लागा तयारीला आणि वाजू द्या सनई-चौघडे!