जुन्या घराचे छत कोसळले; विवेक विहारमध्ये एकच खळबळ

    दिनांक :17-Nov-2026
Total Views |
नवी दिल्ली
Delhi Building Collapse
राजधानी दिल्लीतील विवेक विहार परिसरात जुन्या इमारतीची छत कोसळून मोठी दुर्घटना घडली. मंगळवारी सकाळी सुमारे १०.३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. ग्राउंड प्लस दोन मजली असलेल्या जुन्या घराचे छत अचानक कोसळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. या दुर्घटनेत काही नागरिक मलब्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात आली.



घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाला सकाळी १०.३० वाजता आपत्कालीन कॉल प्राप्त झाला. त्यानंतर अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी रवाना करण्यात आल्या. बचाव पथकांनी घटनास्थळी पोहोचून मलब्याखाली अडकलेल्या नागरिकांचा शोध घेण्यास सुरुवात केली. या दुर्घटनेत जखमी झालेल्या काही नागरिकांना मलब्यातून सुरक्षित बाहेर काढण्यात आले असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी बचावकार्य सुरू असून, दुर्घटनेचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.