कारंजा लाड,
demand-for-laying-insulated-cables शहरातील भिलखेडा परिसरातील लीला कॉलनी परिसरात विद्युत सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. घरासमोरून आणि वेल्डिंग दुकानावरून गेलेल्या कमी दाबाच्या वीजवाहिनीवरील तारांचे एकमेकांशी घर्षण होत असल्याने वारंवार ठिणग्या उडत आहेत. या ठिणग्यांमुळे आग लागण्याची शयता असून, मोठी दुर्घटना घडण्यापूर्वीच महावितरणने या समस्येवर उपाययोजना करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

लीला कॉलनीतील प्लॉट क्रमांक १ येथे राहणारे पुरुषोत्तम शालिग्राम कानकीरड यांनी १६ नोव्हेंबर रोजी महावितरणच्या कारंजा येथील उपकार्यकारी अभियंत्यांना निवेदन देऊन ही समस्या मांडली आहे. त्यांच्या घरासमोरून एल.टी. वीजवाहिनी गेली असून, या वाहिनीवरील तारांचे ठिकठिकाणी एकमेकांशी घर्षण होत आहे. परिणामी घरासमोर तसेच वेल्डिंग दुकानासमोर सतत आगीच्या ठिणग्या पडत असल्याचे त्यांनी निवेदनात म्हटले आहे.वेल्डिंग दुकानासमोरच अशा प्रकारे ठिणग्या उडत असल्याने आगीचा धोका अधिक वाढला आहे. या प्रकारामुळे घरातील सदस्य, दुकानात येणारे ग्राहक आणि परिसरातील नागरिकांच्या जीवितासह मालमत्तेच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. विद्युत तारांमधील घर्षणामुळे एखाद्या वेळी ठिणग्यांचे रूपांतर आगीत होऊन मोठे नुकसान होण्याची शयता नाकारता येत नाही.
संबंधित वीजवाहिनीची सध्याची स्थिती लक्षात घेता महावितरणच्या अधिकार्यांनी केवळ तात्पुरती डागडुजी न करता कायमस्वरूपी उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे निवेदनकर्त्याचे म्हणणे आहे. त्यासाठी सदर वीजवाहिनीवरील उघड्या तारा काढून सुरक्षित इन्सुलेटेड केबल टाकण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.वीजवाहिनीच्या ठिणग्या एखाद्या मोठ्या दुर्घटनेला निमंत्रण देण्यापूर्वीच महावितरणने जागे व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. आता या निवेदनाची दखल घेऊन संबंधित अधिकारी प्रत्यक्ष पाहणी करतात आणि धोकादायक वीजवाहिनीचा प्रश्न मार्गी लावतात का, याकडे स्थानिक रहीवास्यांचे लक्ष लागले आहे. ता.प्र.इन्सुलेटेड केबल टाकण्याची मागणी...घरासमोरून आणि वेल्डिंग दुकानावरून गेलेल्या कमी दाबाच्या वीजवाहिनीवरील तारांचे एकमेकांशी घर्षण होत असल्याने वारंवार ठिणग्या उडत आहेत. या ठिणग्यांमुळे आग लागण्याची शयता असून, मोठी दुर्घटना घडण्यापूर्वीच महावितरणने तारा काढून इन्सुलेटेड केबल टाकण्याची मागणी करण्यात आली आहे.