आठवडी बाजार रविवारी करण्याची मागणी नपने फेटाळली

    दिनांक :17-Nov-2026
Total Views |
पुलगाव,
municipal-council येथील आठवडी बाजाराचा दिवस सोमवारवरून रविवारी करण्याची फळ-भाजी विक्रेत्यांची मागणी नगरपालिका प्रशासनाने फेटाळून लावली आहे. यापूर्वीप्रमाणेच आठवडी बाजार सोमवारीच भरणार असल्याचा निर्णय नगरपालिकेने घेतला असून याबाबतचे पत्र व्यापार्‍यांना देण्यात आले आहे.
 
  
पुलगाव येथे दर सोमवारी आठवडी भाजी व इतर वस्तूंचा बाजार भरतो. बाजाराचा दिवस बदलून तो रविवारी करावा, अशी मागणी फळ-भाजी विक्रेत्यांनी निवेदनाद्वारे केली होती. अमरावती, धामणगाव व इतर गावांहून व्यापारी पुलगाव येथे येऊन फळ-भाजीचा व्यवसाय करतात. त्यामुळे स्थानिक लहान-मोठ्या सर्व विक्रेत्यांच्या व्यवसायावर परिणाम होऊन नुकसान होते. बाजार रविवारी केल्यास बाहेरगावचे व्यापारी जेथून येतात, तेथे स्थानिक बाजार रविवारी भरत असल्याने त्या दिवशी त्यांना पुलगावला येणे शय होणार नाही. त्यामुळे स्थानिक व्यापारी आपला व्यवसाय करू शकतील, असे निवेदनात म्हटले होते. दरम्यान, या विषयावरून गेल्या आठ दिवसांपासून समाज माध्यमांवर पुलगावातील काही स्थानिक नेते सक्रिय होऊन राजकारण करत होते. मात्र, नगरपालिकेच्या या एका निर्णयाने त्यांचे राजकारण बंद होणार असल्याची चर्चा शहरात सुरू आहे.