नवी दिल्ली,
dhoni-retires-from-the-ipl आयपीएल २०२७ च्या खेळाडूंची कायम ठेवण्याची यादी जाहीर होण्यापूर्वीच क्रिकेटविश्वातून मोठी बातमी समोर आली आहे. चेन्नई सुपर किंग्सचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने आयपीएलमधून निवृत्ती जाहीर केल्याचे वृत्त आहे. त्यामुळे आगामी हंगामात धोनी मैदानावर खेळताना दिसणार नाही. मात्र, तो चेन्नई सुपर किंग्ससोबत नव्या भूमिकेत जोडला जाणार असून संघाच्या मार्गदर्शकपदाची जबाबदारी स्वीकारणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
धोनीचा चेन्नई सुपर किंग्ससोबतचा प्रवास २००८ मध्ये पहिल्या आयपीएल हंगामापासून सुरू झाला. सुरुवातीपासूनच त्याने संघाचे नेतृत्व करत चेन्नईला वेगळी ओळख मिळवून दिली. दरम्यान, सीएसकेवर दोन वर्षांची बंदी घालण्यात आली होती. या काळात धोनी दुसऱ्या संघाकडून खेळला. मात्र, चेन्नई सुपर किंग्सचे आयपीएलमध्ये पुनरागमन झाल्यानंतर त्याने पुन्हा याच संघाची साथ दिली. आता खेळाडू म्हणून आयपीएलमधील कारकिर्दीला पूर्णविराम देत धोनी नव्या जबाबदारीसह चेन्नईच्या संघव्यवस्थापनाचा भाग राहणार असल्याचे वृत्त समोर आले आहे.