अनिल कांबळे
नागपूर
Suicide घरात कुणीही नसताना १८ वर्षीय तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. रिमझिम त्रिभुवन प्रसाद असे मृत तरुणीचे नाव आहे. अजनी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बालाजीनगर परिसरात ही घटना घडली. रिमझिमने नेमकी आत्महत्या का केली? याचे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रिमझिम प्रसाद ही मानेवाडा रोडवरील बालाजीनगरमधील बिहारी गल्ली येथे कुटुंबासह राहत होती. तिचे आजोबा जय नारायण शिवलोचन महतो (६४) यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, कुटुंबातील सर्व सदस्य छठपूजेच्या कार्यक्रमासाठी बाहेर गेले होते. त्यामुळे रिमझिम घरी एकटीच होती. याचदरम्यान तिने खोलीतील सिलिंग फॅनला साडीने गळफास घेतला. कुटुंबीयांना ही माहिती मिळताच त्यांनी तिला तातडीने मेडिकल रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केले. अजनीचे उपनिरीक्षक अल्लानूर शेख यांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. तरुणीच्या आत्महत्येचे कारण पोलिस घेत आहेत.