अनिल कांबळे
नागपूर,
Obscene Photos नागपुरातील नामांकित ‘जेईई आणि नीट’च्या कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये नोकरी करणाऱ्या शिक्षिकेने स्वत:चे अश्लील व्हिडिओ आणि फोटो अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या व्हॉट्सअपवर पाठवले. १३ नोव्हेंबर रोजी 'चाइल्ड हेल्पलाइन १०९८' वर एका विद्यार्थ्याचा फोन आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर पोलिसांनी तपास करून 'पोक्सो' कायदा आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या धक्कादायक घटनेमुळे पालक वर्गांत एकच खळबळ उडाली असून आता मुलींसह मुलेसुद्धा सुरक्षित नसल्याची भावना निर्माण झाली आहे.

नागपुरातील एका नामांकित कोचिंग इंस्टिट्युटमध्ये २५ वर्षीय तरुणी शिक्षका पदावर नोकरी करते. त्या कोचिंग क्लासमध्ये अकरावी आणि बारावीचे विद्यार्थी-विद्यार्थिनी आहेत. गेल्या जुलै महिन्यात आरोपी शिक्षिकेने काही विद्यार्थ्यांच्या व्हॉट्सअपवर ‘हाय’ असा मॅसेज केला. त्या विद्यार्थ्यांनी शिक्षिकेला रिप्लाय केला. त्यानंतर हळूहळू ती शिक्षिका काही विद्यार्थ्यांना अश्लिल विनोद आणि भावना जागृत करणारे मॅसेज करीत होती. त्यानंतर तिने काही विद्यार्थ्यांना चक्क स्वत:चे अश्लील फोटो पाठवले. विद्यार्थ्यांनकडून कोणतीही तक्रार होत नसल्याचे लक्षात येताच शिक्षिकेने स्वत:चे अश्लील व्हिडिओ पाठवणे सुरु केले. अशाप्रकारे अनेक विद्यार्थ्यांच्या मोबाईलवर त्या शिक्षिकेने स्वत:चे अश्लील फोटो आणि व्हिडिओ पोस्ट केले.
असे फुटले शिक्षिकेचे बिंग
एका विद्यार्थ्याच्या पालकाच्या ही बाब लक्षात आली. त्यांनी या प्रकरणाची माहिती जिल्हा बाल संरक्षण अधिकारी, मुश्ताक पठाण यांच्यापर्यंत पोहचवली. त्यांनी बालकांच्या संरक्षणाच्या दृष्टीने गांभीर्याने दखल घेतली. त्यानंतर चाईल्ड हेल्पलाईन पथकातील पूजा कांबळे, मीनाक्षी धडाडे यांनी संबंधित प्रकरणाची प्राथमिक चौकशी करून आवश्यक माहिती व पुरावे संकलित केले आणि पोलिसांकडे तक्रार दाखल केली. या प्रकरणी बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
"पोलिसांनी संबंधित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तसेच संबंधित व्यक्तींचा जबाब नोंदवला आहे. अधिक पुरावे गोळा केले जात आहेत. या प्रकारामुळे बाधित झालेल्या सर्व अल्पवयीन मुलांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. पडताळणीदरम्यान काही फोटो आणि व्हिडिओही सापडले आहेत.
- रमेश धुमाळ (पोलिस उपायुक्त)
सदर प्रकरण गंभीर स्वरुपाचे असून मुलांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अनेक ट्युशन क्लासेस आणि शाळांमध्ये चाईल्ड प्रोटेक्शन पॉलिसी नाही. याबाबत पालकांनी सजग होणे गरजेचे आहे.
- मुस्ताक पठाण (जिल्हा बाल संरक्षण अधिकारी)