मंडईतील डान्स हंगामाच्या नावाखाली साधुसंतांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न!

मोहाडी तालुक्यात संतापजानक प्रकार

    दिनांक :17-Nov-2026
Total Views |
भंडारा,
outrageous-incident-in-mohadi-taluka सांस्कृतिक वारसा जपत मनोरंजन करण्याच्या दृष्टीने होणाऱ्या मंडई उत्सवात अश्लील डान्स हंगामाचा शिरकाव झाल्याने मंडई उत्सवाचा मुख्य हेतू बाजूला सरला जात आहे. मोहाडी तालुक्यातील एका गावात झालेला मंडईतील डान्स हंगामा आणि त्यात हिंदू साधूंच्या संदर्भात साकारलेली आक्षेपार्ह भूमिका संतापजनक असल्याच्या प्रतिक्रिया पुढे येत असून हिंदुत्ववादी संघटनांनी याचा तीव्र शब्दात निषेध केला आहे.
 
 
outrageous-incident-in-mohadi-taluka
 
झाडीपट्टी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भंडारा गोंदिया जिल्ह्यात दिवाळी होताच भाऊबीज पासून मंडईला सुरुवात होते. ग्रामीण भागातील मंडळी उत्सव ग्रामीण संस्कृतीचा सांस्कृतिक वारसा आणि सामाजिक एकोपा जपणारा म्हणून ओळखला जातो. मागील काही वर्षात चित्र बदलेले असून मनोरंजन आणि समाज प्रबोधनाच्या कार्यक्रमाची जागा अश्लील डान्स हंगामा आणि नृत्याने घेतली आहे. प्रशासन, पोलीस विभागाकडून मानस हंगामा न करण्याचे आवाहन केले जाते मात्र, फारसे मनावर घेतले जात नाही. असाच एक प्रकार पुन्हा एकदा पुढे आला आहे. मोहाडी तालुक्यात असलेल्या निलज खुर्द येथे दोन दिवसांपूर्वी मंडई साजरी झाली. या मंडईत चक्क अर्धवट कपडे परिधान केलेल्या महिलांकडून अश्लील डान्स करण्यात आले.
 
 
यापेक्षाही संताप जनक प्रकार म्हणजे साधूंच्या वेशात एका व्यक्तीला बसवून त्याच्या भोवताल हा डान्स करून साधुसंतांचा अपमान करण्यात आला. संतांची भूमी असलेल्या महाराष्ट्रात साधू संतांची परंपरा आदर्श अशी असेज. मात्र त्यांना वेगळ्या पद्धतीने दाखवून परंपरेचा अपमान करण्याचा प्रयत्न आयोजकांकडून करण्यात आला आहे. या संदर्भातील व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हिंदुत्ववादी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी प्रकाराचा निषेध केला आहे. ग्रामीण भागात मुंबईच्या नावाखाली असे प्रकार होत असतील तर पोलीस प्रशासनाने यावर अंकुश लावावा अशी मागणी करण्यात आली आहे.
 
हा प्रकार अत्यंत निंदनीय : डोंगरवार
डान्स हंगामाच्या नावाखाली साधुसंतांचा अपमान करण्याचा प्रकार अत्यंत घृणास्पद आणि संतापजनक आहे. महाराष्ट्रात हे कधीही खपवून घेतले जाणार नाही. साधू संतांची प्रतिमा मलिन करून त्यांचे विचित्र स्वरूप मांडणाऱ्या प्रत्येकावर कायदेशीर कारवाई करावी भविष्यात असे प्रकार होणार नाही याची काळजी घ्यावी, अन्यथा विश्व हिंदू परिषद आक्रमक भूमिका घेईल अशी प्रतिक्रिया विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष अनिल डोंगरवार यांनी तभाशी बोलताना दिली.