स्पर्धेत टिकण्यासाठी विद्यार्थ्यांना टॅबलेटचा चांगला उपयोग होईल : पालकमंत्री

महाज्योतीच्या वतीने विद्यार्थ्यांना टॅबलेट व डाटा सिमकार्डचे वितरण

    दिनांक :17-Nov-2026
Total Views |
वर्धा,
guardian-minister मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना स्पर्धेत टाकण्यासोबतच आपले करीअर करण्याची उत्तम संधी टॅबलेटच्या माध्यमातून मिळणार आहे. यामाध्यमातून विद्यार्थ्यांनी आपल्या पालकाचे स्वप्न पूर्ण करावे, असे आवाहन पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात इतर मागास बहुजन कल्याण विभाग व महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या वतीने (महाज्योती) इतर मागास वर्ग, विमुत जाती भटया जमाती व विशेष मागास प्रवर्गातील जेईई, नीट, एमएचटी सीइटीचे प्रशिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांना टॅबलेट व डाटा सिमचे वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर, इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहाय्यक संचालक संतोष गवई, महाज्योतीचे दीपेंद्र मोदी, अनिकेम चौधरी आदी उपस्थित होते.
 

guardian-minister
 
संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेत यश संपादन करण्यासाठी मोफत प्रशिक्षणाची सुविधा निर्माण करुन देण्यात आली आहे. संस्थेच्या वतीने मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक युगात समान संधी निर्माण करुन देण्याचे काम राज्य शासन करीत असल्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर म्हणाले. विद्यार्थ्यांनी आपले करीअर करताना ताण तणावात न राहता महाज्योतीच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांचा लाभ घेऊन करीअर करावे, असे आवाहनही पालकमंत्री डॉ. भोयर यांनी केले.
 
 
संतोष गवई यांनी महाज्योतीच्या वतीने जिल्ह्यातील दहावीची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या व अकरावी व बारावीमध्ये शिक्षण घेत असलेल्या जेईई, नीट, एमएचटी सीईटी या परीक्षांचा अभ्यास करणार्‍या जिल्ह्यातील ६१ विद्यार्थ्यांना टॅबलेट व ६ जीबी प्रति दिवस डाटा असलेले सीमचे वितरण करण्यात येत असल्याचे सांगून या योजनेचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन केले.