वडनेर,
balu-mungale जगाच्या पाठीवर शेतकर्यांएवढा सहिष्णू आणि तेवढाच जिद्दीकोणीच नाही. राज्यात दुष्काळाचे अभूतपूर्व संकट. नापिकी, निसर्गाचा असमतोल. सरकार आमच्या पाठीशी नाही. वगैरे वगैरे. शेवटी शेती आणि बदनाम होतोय तो शेतकरीच! पण, याला अपवाद ठरतेय हिंगणघाट तालुयातील दारोडा येथील ३० वर्षीय युवा शेतकरी प्रीतम पोहाणे! जिद्द आणि अहोरात्र उपसलेले कष्टाने त्याला येणार असलेले उत्पादनाचा विचार केला तर कसणार्याला देव देतोच या युतीचा अनुभव आल्याशिवाय राहत नाही. याचा अर्थ बाकी शेतकरी कसत नाहीत असा होत नाही, हे उल्लेखनिय!
प्रीतमने दुष्काळासोबत दोन हात करीत काळ्या माऊलीवर निस्सिम प्रेम करून दोन एकरात असंख्य अडचणी, निसर्गाची अवकृपा आणि कृत्रिम अडचणींवर मात करीत अभूतपूर्व असे तुरीचे पीक बहरविले आणि क्रांतीच घडवली. या कष्टाचे फळ म्हणजे दोन एकरात सुमारे ३० क्विंटल तूरीचे उत्पादन हमखास होणार असल्याचा आत्मविश्वास तरुण शेतकरी प्रितम पोहाणे यांनी तरुण भारत प्रतिनिधीसोबत बोलताना व्यत केला.
योग्य पीक निवड, आधुनिक तंत्रज्ञान, बाजारपेठेचा अभ्यास, उत्पादनाचे नियोजन आणि व्यावसायिक दृष्टिकोन याची जोड दिल्यास शेतीतूनही करोडोची उलाढाल करता येऊ शकते हे प्रीतमने सिद्ध करून दाखवलेे. पारंपरिक शेतीच्या चौकटी बाहेर जाऊन कृषी क्षेत्रातील ज्येष्ठ पत्रकारांचे लेख वाचन, गावातील ज्येष्ठ आणि कृषी विभागातील अधिकार्यांचे मार्गदर्शन यांची सांगड घालून जिद्द आणि अपार कष्टाने तूर पीक उत्पादन दुष्काळाच्या सावटाखाली विक्रमी होईल असेच चित्र निर्माण केलेले आहे.
घरीची परिस्थिती जेमतेम. अत्यंत हलकीच्या परिस्थितीला सामोरे जाताना वडील गावोगावी फिरून छोटा व्यवसाय करणारे, प्रीतम कुटुंबातील मोठा. पदवीधर झाला. परंतु, घरची परिस्थिती हलखीची. पाच एकर घरची शेती. शेती करून धड कुटुंब जगवता येईना. मात्र, प्रीतमने धीर सोडला नाही. खांद्यावर शेतीचा भार उचलून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीचा संसार फुलविला. शेतकरी प्रीतमने लाल क्रांती हे घरगुती तुरीचे बियाणे दोन एकर शेतात दोन ओळींमध्ये साडेसात फुटाचे अंतर घेऊन तूर पिकाची लागवड केली. योग्य निगा घेतल्याने आपल्याला तुरीचे भरघोस पीक होणार असल्याचे प्रीतम म्हणाला.
वडिलांचा अपघात झाला आणि त्या अपघाताने आपण शिक्षण सोडून शेतीकडे वळलो. शेतीमध्येच प्रगती करायची असा विडा ८ वर्षांपूर्वी उचलला. सुरुवातीला थोडा त्रास झाला, निराशाही आली. पण, जिद्दीने शांत बसू दिले नाही. आता त्याच शेतीतून रग्गड पीक येण्याची शाश्वती झाली. शेतकर्यांनी आत्महत्या करून जीव दिल्यापेक्षा शेतीत जीव ओतला तर जीव देण्याची वेळ येत नसल्याचे प्रितमने सांगितले.