प्रेमात दगा मिळाल्याने युवतीची आत्महत्या

    दिनांक :17-Nov-2026
Total Views |
अनिल कांबळे
 
नागपूर,
young-woman-dies-by-suicide तीन वर्षांपासून एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाल्यानंतर प्रियकाराने जीवनात आणखी एक तरुणी आली. प्रियकराने पहिलीशी ‘ब्रेक अप’ करुन दुसरीशी प्रेमसंबंध ठेवून दगाबाजी केली. त्यामुळे नैराश्यात गेलेल्या तरुणीने एक्सपायर्ड व्हिटॅमिन-सी फेस सीरम प्राशन करून आत्महत्या केली. हुडकेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील विठ्ठलवाडी, राजापेठ बसस्टॉपजवळ ही हृदयद्रावक घटना उघडकीस आली. प्रणिता (२५) असे मृत तरुणीचे नाव आहे.
 
 
young-woman-dies-by-suicide
 
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रणिताचे एका तरुणासोबत प्रेमसंबंध होते. तीन वर्षांपूर्वी तरुणाने दगाबाजी करून तिच्यासोबतचे प्रेमसंबंध तोडले. त्याचा तिला जबर मानसिक धक्का बसला. तेव्हापासून ती मानसिक तणावात होती. १२ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६.१५ च्या सुमारास तिने घरात ठेवलेले एक्सपायर्ड व्हिटॅमिन-सी फेस सीरम प्राशन केले. काही वेळातच तिची प्रकृती खालावली आणि तिला उलट्या होऊ लागल्या. कुटुंबीयांनी तिला तातडीने ऑरेंज सिटी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. वडिलांनी दिलेल्या माहितीवरून हुडकेश्वर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.