रायगड,
alibag-traffic-jam-child-diesरायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातून काळीज सुन्न करणारी घटना समोर आली आहे. अलिबागमध्ये रस्त्याच्या कामामुळे होणारी वाहतूक कोंडी आता थेट जीवावर बेतू लागली आहे. बेलकडे ते अलिबाग दरम्यान झालेल्या कोंडीत रुग्णवाहिका तब्बल दोन तास अडकल्याने 20 महिन्यांच्या चिमुरड्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. आरांश ठाकूर असे त्याचे नाव आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, पावणे दोन वर्षांच्या आरांशने खेळता खेळता फुगा गिळला होता. फुगा गिळल्याने त्याचा श्वास कोंडला होता ज्यामुळे त्याची प्रकृती गंभीर झाली होती. मुलाची ही अवस्था बघून घाबरलेल्या पालकांनी त्याला तातडीने अलिबाग जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्यासाठी रुग्णवाहिका बोलावली.
मात्र रुग्णवाहिका अलिबाग-बेलकडे मार्गावरील वाहतूककोंडीत तब्बल दीड तास अडकून पडली. चिमुकल्याचे आई वडील रुग्णवाहिकेला पुढे जाण्यास रस्ता द्यावा, यासाठी जिवाच्या आकांताने आक्रोश करत होते. वेळेत रुग्णालयात पोहोचता न आल्याने आरांशला जीव गमवावा लागला. या घटनेने बामणगाव परिसरात हळहळ व्यक्त होत असून, वाहतूक नियोजनाच्या अभावावर संताप व्यक्त केला जात आहे.