दिवसभर आंदोलनात अग्रेसर, रात्री वृदयविकाराने मृत्यू

27 वर्षीय कनिष्ठ लिपिकाच्या जाण्याने हळहळ!

    दिनांक :18-Nov-2026
Total Views |
भंडारा,
bhandara-court-clerk-diesदिवसभर आंदोलनात सहभागी होत, सहकाऱ्यांच्या सोबतीने आपल्या मागण्या ठामपणे मांडणाऱ्या एका 27 वर्षीय कनिष्ठ लिपिकाचा रात्री वृदयविकाराने दुर्दैवी मृत्यू झाला. निखिल वंजारी असे या तरुणाचे नावं असून न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या सुरु असलेल्या आंदोलनात 17 रोजी दिवसभर सक्रिय होता.
 

bhandara 
समान काम, समान वेतन या मागणीला घेऊन न्यायालयीन अधिकारी व कर्मचारी यांनी 17 नोव्हेंबर पासून बेमुदत आंदोलन पुकारले आहे. पवनी तालुक्यातील कोदुर्ली येथील निखिल वंजारी हा 27 वर्षाचा तरुण भंडारा जिल्हा न्यायालयात कनिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत होता. कालपासून भंडारा न्यायालयासमोर सुरु झालेल्या आंदोलनात तो सहभागी होऊन आपल्या मागण्या ताकदीने मांडताना दिसला. संध्याकाळी आंदोलन झाल्यानंतर निखिल आपल्या गावी कोदुर्लीला परतला. जेवण करून घराबाहेर बाकड्यावर बसला असताना अचानक तो कोसळला. रुग्णालयात नेले असता, त्याला मृत घोषित करण्यात आले. वृदयविकाराने मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले.
तरुण मुलाचा अचानक झालेला मृत्यू वंजारी कुटुंबासाठी मोठा धक्का आहे. निखिल हा अविवाहित होता. दरम्यान आंदोलन सुरु असताना झालेली घटना नक्कीच वेदनानदायी आहे. दरम्यान आज दुसऱ्या दिवशी जिल्ह्यात पुन्हा न्यायालयीन कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरु होताच, निखिलला श्रद्धांजली वाहण्यात आली.