मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरीय कार्यशाळा

भास्कर पेरे पाटील करणार मार्गदर्शन

    दिनांक :18-Nov-2026
Total Views |
वाशीम,
bhaskar-pere-patil-will-provide-guidance ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास, ग्रामपंचायतींची कार्यक्षमता वाढविणे आणि ग्रामविकासाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान सन २०२६-२७ अंतर्गत जिल्हा परिषद वाशीमच्या वतीने गुरुवार, १९ नोव्हेंबर २०२६ रोजी स्थानिक वाटाणे लॉन्स येथे जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
 
 
bhaskar-pere-patil-will-provide-guidance
 
या कार्यशाळेत अभियानाची उद्दिष्टे, अंमलबजावणीची कार्यपद्धती, विविध घटक आणि ग्रामपंचायत स्तरावर करावयाच्या कामकाजाबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी संबंधित अधिकारी, कर्मचारी आणि ग्रामविकास यंत्रणेतील घटकांना आवश्यक दिशा देणे हा या कार्यशाळेचा प्रमुख उद्देश आहे. कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री तथा वाशीम जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे, खासदार संजय देशमुख, खासदार संजय धोत्रे, विधानपरिषद सदस्य भावना गवळी, विधानपरिषद सदस्य किरण सरनाईक, वसंत खंडेलवाल, किरण लिंगाडे, आमदार धर्मगुरू बाबुसिंग महाराज राठोड, आमदार अमित झनक, आमदार श्याम खोडे, आमदार सई डहाके, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चौहान, प्रकल्प संचालक किरण कोवे आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) आत्माराम बोंद्रे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
 
 
 
सकाळी १०.३० वा. दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात येईल. त्यानंतर सकाळी ११ ते ११.३० या वेळेत उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) आत्माराम बोंद्रे हे प्रास्ताविकातून मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाची माहिती देणार आहेत. कार्यशाळेच्या पहिल्या सत्रात मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानातील विविध घटकांवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. यामध्ये भाऊराव बेलखेडकर, शालिग्राम पडघन, प्रमोद लोखंडे आणि मोहन भुसारी हे मार्गदर्शन करणार आहेत. दुपारी १.३० ते २.३० या वेळेत भास्कर पेरे पाटील हे तर मार्गदर्शन करणार आहेत. सहाय्यक गटविकास अधिकारी (पंचायत विभाग) गजानन खुळे यांच्या उपस्थितीत कार्यशाळेचा समारोप होणार आहे. जिल्ह्यातील ग्रामविकास यंत्रणेने अभियानाची उद्दिष्टे समजून घेऊन त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने ही कार्यशाळा महत्त्वपूर्ण ठरणार आहे.