मुंबई,
gold-silver-prices-dropमागील दोन दिवसांपासून सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळत आहे. आजही सोन्या-चांदीच्या किमतीत घट कायम असल्याने ग्राहकांसाठी खरेदीची चांगली संधी निर्माण झाली आहे. अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या तुळशी विवाहाच्या पार्श्वभूमीवर आणि आगामी लग्नसराईसाठी सोने-चांदी खरेदीचा विचार करणाऱ्यांसाठी ही दिलासादायक बातमी आहे.
दरम्यान, बुधवारी देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात मौल्यवान धातूंच्या किमतीत पुन्हा घसरण नोंदवण्यात आली. मजबूत अमेरिकन डॉलर, अमेरिकेतील वाढते ट्रेझरी बाँड यील्ड आणि व्याजदरवाढीच्या शक्यतेमुळे सोन्याच्या किमतीवर दबाव निर्माण झाला आहे. परिणामी, आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर 14 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर पोहोचले आहेत. चांदीच्या दरातही घसरण सुरूच आहे.
सोन्याचे दर
सोने दर (प्रति 10 ग्रॅम)
24 कॅरेट सोने: 1,36,923 रुपये
22 कॅरेट सोने: 1,25,421 रुपये
18 कॅरेट सोने: 1,02,692 रुपये
चांदीचा दर
999 शुद्ध चांदी: 1,72,024 प्रति किलो रुपये
प्रति 10 ग्रॅम चांदी: 1,720 रुपये