होर्मुज,
hormuz-ship-attack-24-indians-safeहोर्मुज खाडीत तणाव पुन्हा वाढताना दिसत आहे. त्यातच ओमानच्या किनारपट्टी भागात आणि होर्मुज खाडीत पनामाच्या ध्वज असलेल्या जहाजावर क्षेपणास्त्राने हल्ला करण्यात आला. या जहाजावर तब्बल 24 भारतीय खलाशी होते. यात एकून 25 खलाशी होते, त्यापैकी 24 भारतीय होते. हे जहाज एलपीजी गॅस वाहून नेत होते. अचानक क्षेपणास्त्राने हल्ला करण्यात आल्याने मोठी आग लागली. भारतीय खलाशी सुरक्षित असल्याची माहिती मिळत आहे. भारत सरकार अॅक्शन मोडवर असून भारताने या हल्ल्याचा निषेध करत खडेबोल सुनावले आहेत. या जहाजावरील 24 भारतीय खलाशी सुरक्षित असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली. हेच नाही तर या खलाशांच्या सुरक्षेसाठी परराष्ट्र मंत्रालय ओमानमधील भारतीय दूतावाच्या संपर्कात देखील आहे.
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी एक्सवर एक प्रसिद्धीपत्रक शेअर केले. त्यावर सर्व माहिती देण्यात आली. 16 नोव्हेंबर 2026 रोजी स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये पनामाचा ध्वज असलेल्या एमटी तारा गॅस या एलपीजी टँकर जहाजावर झालेल्या हल्ल्याचा परराष्ट्र मंत्रालयाने निषेध केला आहे. 24 भारतीय नागरिकांपैकी 21 जणांना सुरक्षित काढण्या आले.
या काळात ओमान सरकारकडून मदत केली जात असून त्यांचे आम्ही आभार मानतो. जहाजावरील हल्ला हा अत्यंत गंभीर आहे. सतत हल्ले केले जात आहेत. खलाशांच्या सुरक्षेच्या प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. व्यापारी जहाजांना आणि नागरी पायाभूत सुविधांना लक्ष्य करणे थांबले पाहिजे, असे भारताने थेट म्हटले.
त्यापूर्वी भारताचे बंदरे जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत 16 नोव्हेंबर रोजी होर्मुज खाडीत जहाजावर झालेल्या हल्ल्याची माहिती देत एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली होती. पनामाचा ध्वज असलेल्या तारा गॅस या एलपीजी टँकरवर क्षेपणास्त्राने हल्ला करण्यात आला असल्याची माहिती त्यांनी दिली होती.