सहा जिल्ह्यांना यलो अलर्ट, विदर्भातही तापमानाचा पारा चढणार

    दिनांक :18-Nov-2026
Total Views |
मुंबई
Maharashtra Weather Update राज्यातून मान्सूनचा प्रभाव ओसरल्यानंतर आता ऑक्टोबर हिटचा तीव्र तडाखा जाणवू लागला आहे. साधारणपणे या काळात हवेत गारवा निर्माण होण्यास सुरुवात होते. मात्र, यंदा राज्यातील वातावरणात वेगळेच बदल पाहायला मिळत असून अनेक भागांत उष्णतेची लाट सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार, ३ ऑक्टोबर रोजी कोकण किनारपट्टीसह राज्यातील बहुतांश भागांत उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर किनारपट्टीवरील जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे.
 

Maharashtra Weather Update 
कोकणातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सहाही जिल्ह्यांमध्ये ३ ऑक्टोबर रोजी उष्णतेसोबतच अत्यंत दमट वातावरण राहण्याचा अंदाज आहे. मुंबई आणि आसपासच्या परिसरात कमाल तापमान २७ ते ३५ अंश सेल्सिअसदरम्यान राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अचानक वाढलेल्या उकाड्यामुळे डिहायड्रेशन, चक्कर येणे आणि उष्माघातासारख्या आरोग्यविषयक Maharashtra Weather Update समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे नागरिकांनी पुरेसे पाणी प्यावे आणि दुपारच्या वेळी उन्हात जाणे शक्यतो टाळावे, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.
दरम्यान, उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यांतही उन्हाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. नाशिकमध्ये तापमान २७ ते ३५ अंश सेल्सिअसदरम्यान राहू शकते. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे शहर आणि आसपासच्या भागांत तापमान २२ ते ३५ अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज असून या परिसरात हवामान कोरडे राहणार आहे.
मराठवाड्यातील छत्रपती Maharashtra Weather Update संभाजीनगरमध्ये तापमानाचा पारा ३७ अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, विदर्भातील नागपूर, अकोला आणि अमरावती या जिल्ह्यांसाठी कोणताही थेट इशारा देण्यात आलेला नसला, तरी या भागांत तापमान २७ ते ३८ अंश सेल्सिअसदरम्यान राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे विदर्भातही नागरिकांना तीव्र उकाड्याचा सामना करावा लागू शकतो.