चीनच्या विस्तारवादाला क्वाडचा लगाम!

    दिनांक :18-Nov-2026
Total Views |

मनिला,
quad-china-indo-pacific-strategyबळाचा किंवा दबावाचा वापर करून सध्याची परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न करणाऱ्या अस्थिरतावादी अथवा एकतर्फी कृतींना विरोध असल्याचे ‘क्वाड’च्या चारही देशांनी मंगळवारी येथे स्पष्ट करीत इंडो-पॅसिफिकमध्ये चीनला शह देण्यासाठी क्वाडचा कृती आराखडा मांडला. बैठकीनंतर क्वाडने संयुक्त निवेदन प्रसिद्ध केले. गेल्या दशकभरात क्वाडने शांतता, स्थैर्य आणि समृद्धीसाठी कार्य करणारी ‘सकारात्मक शक्ती’ आणि कृतिशील भागीदारी म्हणून आपली ओळख निर्माण केल्याचे या निवेदनात म्हटले आहे.
 

china quade 
आर्थिक दबाव निर्माण करण्याच्या कृतींबद्दल, विशेषतः मनमानी निर्यात निर्बंधांबद्दल क्वाड नेत्यांनी गंभीर चिंता व्यक्त केली. महत्त्वाच्या पुरवठा साखळ्यांचे संरक्षण, सागरी मार्गांवरील मुक्त वाहतुकीचे स्वातंत्र्य, भविष्यातील तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विकासाला चालना आणि विश्वासार्ह कृत्रिम बुद्धिमत्तेतील (एआय) गुंतवणूक व तिचा वापर वाढविण्याची बांधिलकीही त्यांनी व्यक्त केली.
शिखर परिषदेमुळे संबंध पुन्हा पूर्वपदावर
ट्रम्प यांच्या या हलक्याफुलक्या टिप्पण्यांच्या पार्श्वभूमीवर भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंधांमधील तणाव विशेषत्वाने जाणवतो. ट्रम्प यांच्या दुसऱ्या कार्यकाळात दोन्ही देशांमधील संबंध अत्यंत कठीण टप्प्यातून जात आहेत. ट्रम्प यांनी पदभार स्वीकारल्यानंतर प्रथमच झालेल्या क्वाडच्या शिखर परिषदेमुळे हे संबंध पुन्हा पूर्वपदावर येण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती.