चंद्रपूर,
chandrapur crime चंद्रपूर शहरातील सर्वात मुख्य चौक असलेल्या प्रियदर्शनी इंदिरा गांधी चौकात एका अज्ञात पुरुषाचे कापलेले शीर आढळल्याने खळबळ उडाली आहे. सौंदर्यीकरणं केलेल्या इंदिरा गांधी पुतळ्याच्या मागच्या भागात हे शीर आढळल्यावर श्वानपथकाने माग काढल्यानंतर उर्वरित धड काही अंतरावर रेल्वे उड्डाणपुलाच्या खाली असलेल्या जाहिरातींच्या फलकाच्या खांबाखाली आढळले. पोलिसांनी संपूर्ण परिसराची तपासणी सुरू केली आहे. या इसमाची अन्यत्र हत्या करून हे दोन्ही भाग इथे फेकल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे. शहराच्या अतिव्यस्त मध्यवर्ती भागातील या घटनेने चंद्रपूर शहरात एकच खळबळ उडाली आहे. मयताची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
सुरेश परमार नावाच्या व्यापाऱ्याच्या घराजवळून त्यांच्या वाहन चालकाच्या ताब्यातून कार पळवून घेऊन जात अज्ञात लुटारूंनी रोकड लुटल्याची माहिती समोर आली आहे. काल रात्री उशिरा सुरेश परमार यांचे वाहन चालक मोहन राव कार आणि त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर रोकड घेऊन निघत असताना अज्ञात लुटारूंनी चाकूचा धाक धडकून कार पळवून नेली. नागपूर जिल्ह्याच्या खैरी भागात लुटारूंनी पळवून नेलेली कार सोडून देत त्याच्यातील रोकड सोबत नेल्याची माहिती आहे. सध्या नागपूर पोलिसांचे विविध पथक लुटारूंचा शोध घेत आहे. लुटारुंनी व्यापारी सुरेश परमार यांच्या घरासमोरील गार्डला चाकूने जखमी केल्याची ही माहिती आहे.
7 नोव्हेंबर रोजी प्रतीक अंबवले आणि प्रतीक जाधव यांची पनवेल रेल्वे स्थानकावर भेट झाली. त्यानंतर दोघांनी शिवकर गावातील एका शाळेच्या पाठीमागे बसून दारू प्यायली. यावेळी आयफोनच्या ईएमआयवरून दोघांमध्ये वाद झाला. अंबवले याने आयफोन खरेदी करण्यासाठी जाधवच्या नावावर कर्ज घेतले होते; मात्र हप्त्याचे पैसे देणे बंद केल्याने कर्ज कंपनीकडून जाधवला वारंवार फोन येत होते. याच रागातून जाधवने चाकूने वार करून अंबवलेची हत्या केली. कोपरी पोलिसांच्या चौकशीत हा प्रकार उघडकीस आला असून, पनवेल शहर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अटक करण्यात आली आहे.