कारंजा लाड,
karanja-taluka मागील काही दिवसांपासून वातावरणात सातत्याने बदल होत असून, शीतलहरीच्या प्रभावामुळे कारंजा तालुयात थंडीचा कडाका वाढला आहे. सकाळच्या तापमानाचा पारा थेट १५ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आल्याने नागरिकांना हुडहुडी भरू लागली आहे. पहाटे आणि रात्रीच्या वेळी थंडीची तीव्रता अधिक जाणवत असून, सकाळी घराबाहेर पडणारे नागरिक उबदार कपड्यांचा आधार घेताना दिसत आहेत. अचानक वाढलेल्या थंडीमुळे जनजीवनावरही परिणाम जाणवू लागला आहे.

गेल्या काही दिवसांपासून सकाळच्या वातावरणात गारवा वाढला असून, पहाटेच्या वेळी रस्त्यांवर वर्दळही तुलनेने कमी दिसत आहे. मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडणारे नागरिक, शेतकरी, शेतमजूर तसेच कामानिमित्त घराबाहेर जाणार्या नागरिकांना थंडीचा सामना करावा लागत आहे. विशेषतः लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांनी थंडीपासून बचाव करण्यासाठी अधिक काळजी घेण्यास सुरुवात केली आहे. सकाळी उशिरापर्यंत हवेत गारवा टिकून राहत असल्याने नागरिकांना ऊन पडेपर्यंत उबदार कपड्यांचा आधार घ्यावा लागत आहे. दरम्यान, वाढलेल्या थंडीचा परिणाम शेतीवरही होण्याची शयता आहे. सध्या खरीप हंगामातील तूर पीक फुले व शेंगाच्या महत्त्वाच्या टप्प्यात असून, वातावरणातील गारवा आणि पोषक हवामानामुळे तुरीच्या पिकाला फायदा होण्याची अपेक्षा शेतकर्यांकडून व्यक्त होत आहे.
तुरीच्या पिकाला योग्य प्रमाणात थंड हवामान मिळाल्यास पिकाच्या वाढीस आणि पुढील फुलोरा व शेंगा धरण्याच्या प्रक्रियेस अनुकूल परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे यंदाच्या हंगामात उत्पादनाच्या आशेने असलेल्या शेतकर्यांचे लक्ष आता हवामानातील बदलांकडे लागले आहे.मात्र, तापमानात अचानक होणारी घट, अवकाळी पाऊस किंवा ढगाळ वातावरण यांचा पिकावर विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे शेतकर्यांनी पिकाची नियमित पाहणी करणे आवश्यक आहे. एकीकडे वाढत्या थंडीमुळे नागरिक उबदार कपड्यांकडे वळले आहेत, तर दुसरीकडे या थंडीचा खरीप हंगामातील तूर पिकाला कितपत फायदा होतो, याकडे शेतकरी वर्गाचे लक्ष लागले आहे. एकूणच, शीतलहरीमुळे कारंजा तालुयात थंडीचे आगमन चांगलेच जाणवू लागले असून, सकाळचा तापमानाचा पारा १५ अंशांवर घसरल्याने नागरिकांना हुडहुडी भरत आहे. थंडीचा हा जोर आगामी काळातही कायम राहणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
गरम कपडे खरेदीकडे नागरिकांचा कल
थंडीचा जोर वाढताच शहरातील बाजारपेठेत गरम कपड्यांच्या खरेदीला वेग आला आहे. स्वेटर, जॅकेट, कानटोपी, मफलर, शाल, हातमोजे तसेच लहान मुलांसाठीच्या उबदार कपड्यांना नागरिकांकडून मागणी वाढत आहे. सकाळी आणि सायंकाळी बाजारपेठेत गरम कपड्यांची खरेदी करण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे. अचानक वाढलेल्या थंडीमुळे गरम कपड्यांच्या विक्रेत्यांमध्येही उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. आगामी दिवसांत थंडीचा जोर कायम राहिल्यास या खरेदीत आणखी वाढ होण्याची शयता व्यक्त केली जात आहे.