जाणून घ्या तुळशी विवाहाचा शुभ मुहूर्त

    दिनांक :18-Nov-2026
Total Views |
tulsi-vivah-2026-date-significanceहिंदू धर्मात तुळशी विवाहाला विशेष महत्त्व आहे. दिवाळीनंतर तुळशी विवाहाची तयारी सुरू होते. तुळशी विवाहानंतर लग्नसराईलाही सुरुवात होते, अशी मान्यता आहे. यंदा 21 नोव्हेंबर 2026 रोजी तुळशी विवाह साजरा केला जाणार आहे. या दिवशी तुळशी मातेचा विवाह भगवान शाळिग्राम यांच्याशी लावला जातो.
 

tulsi vivah 
यंदा 21 नोव्हेंबर 2026 रोजी तुळशी विवाह साजरा केला जाणार आहे. या दिवशी तुळशी मातेचा विवाह भगवान शाळिग्राम यांच्याशी लावला जातो. अनेक घरांमध्ये तुळशी वृंदावन सजवून हा सोहळा पार पडतो. या परंपरेला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे.
 
तुळशी विवाहासाठी कार्तिक शुक्ल द्वादशी तिथी महत्त्वाची मानली जाते. यंदा ही तिथी 21 नोव्हेंबर रोजी सकाळी 6 वाजून 31 मिनिटांनी सुरू होईल आणि 22 नोव्हेंबर रोजी पहाटे 4 वाजून 56 मिनिटांनी संपेल.
 
धार्मिक मान्यतेनुसार, तुळशी विवाहासाठी संध्याकाळचा प्रदोष काळ शुभ मानला जातो. 21 नोव्हेंबर रोजी प्रदोष काळ सायंकाळी 5 वाजून 56 मिनिटांपासून रात्री 8 वाजून 30 मिनिटांपर्यंत आहे. गोधूली मुहूर्त साधारण सायंकाळी 5 वाजून 54 मिनिटांपासून 6 वाजून 20 मिनिटांपर्यंत आहे. स्थानिक पंचांगानुसार मुहूर्ताच्या वेळेत थोडा फरक असू शकतो.
 
काही घरांमध्ये कार्तिकी एकादशीपासून त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत तुळशी विवाह करण्याची परंपरा आहे. यंदा कार्तिकी एकादशी 20 नोव्हेंबरला, तर त्रिपुरारी पौर्णिमा 24 नोव्हेंबरला आहे. त्यामुळे घरातील परंपरेनुसार या काळात तुळशी विवाह केला जातो.