अनिल कांबळे
नागपूर,
obscene act while embracing वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याच्या बहाण्याने तरुणीशी जवळीक साधून तिच्याशी अश्लील वर्तन केल्याचा आणि नंतर तिला धमकावल्याचा प्रकार वाठोडा परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी वाठोडा पोलिसांनी संग्राम पात्रा (४५, रा. श्रीपाद इलाइट, रामकृष्णनगर, वाठोडा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुणी (२५) आणि आरोपी एकाच ठिकाणी इमारतीमध्ये राहतात. २६ फेब्रुवारी २०२६ रोजी तरुणीचा वाढदिवस होता. वाढदिवसानिमित्त परिसरात मिठाई वाटली जात असताना आरोपी दारूच्या नशेत होता. त्याने दरवाजा उघडून तरुणीशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्याने तरुणीशी अश्लील वर्तन केल्याचा आरोप आहे. या प्रकारामुळे घाबरलेल्या तरुणीने त्यावेळी कोणालाही काही सांगितले नाही. त्यानंतरही आरोपीचे वर्तन बदलले नाही. तो तरुणीकडे एकटक पाहत अश्लील शेरेबाजी करीत असल्याचा आरोप आहे. या प्रकारामुळे तरुणी त्रस्त झाली होती. दरम्यान, तरुणीच्या तिसऱ्या मजल्यावरील शेजारी प्रफुल यांच्यासोबत आरोपीचा वाद झाला.obscene act while embracing त्यानंतर आरोपीने तरुणीला पाहून तिला धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे. या प्रकारामुळे त्रस्त झालेल्या तरुणीने अखेर पोलिसांत धाव घेतली. तिच्या तक्रारीवरून वाठोडा पोलिसांनी आरोपीविरुद्ध संबंधित कलमान्वये गुन्हा नोंदविला असून, पुढील तपास सुरू आहे.