अक्वान चक्रीवादळाचा वेग वाढला, ओडिशाला रेड अलर्ट

    दिनांक :19-Nov-2026
Total Views |

cyclone-akwan-landfall-updateबंगालच्या खाडीमध्ये चक्रीवादळ 'अक्वान' निर्माण झालं आहे. हे चक्रीवादळ उद्या धडकणार होत. परंतु त्याचा वेग वाढला आहे. अक्वान चक्रीवादळ गुरुवारी दुपारी आंध्रप्रदेशच्या नरसापुर आणि ओडिशाच्या पुरीच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. सुरुवातीला वाटले की चक्रीवादळ शुक्रवारी धडकेल असा अंदाज होता. मात्र चक्रीवादळ आता एक दिवस पहिलेच म्हणजे आज धडकणार असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. चक्रीवादळचा वेग हा ताशी 90 ते 100 किलोमीटर प्रती तास असू शकते.
 

akwan cuclone 
भारतीय हवामान विभागानुसार, या चक्रीवादळाचा परिणाम 10 राज्यात होऊ शकतो. ओडीशा, पश्चिम बंगाल आणि आंध्र प्रदेश मध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. ओडीशामध्ये खबरदरीचा उपाय म्हणून 50 हजार लोकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आल आहे. एवढच नाही तर 6 जिल्ह्यांमध्ये 3 दिवस शाळा कॉलेज बंद करण्यात आले आहेत तसेच रेल्वेने सुद्धा काही गाड्यांचा वेळ देखील बदलला आहे.
हवामान विभागाने अक्वान चक्रीवादळचा परिणाम 10 राज्यांवर होऊ शकतो अस सांगितल आहे. आंध्रप्रदेश, ओडीशा, तामिळनाडू, पुडूचेरी, तेलंगणा, पश्चिम बंगाल, झारखंड, छत्तीसगड, बिहार, मध्य प्रदेश या १० राज्यांना अक्वान चक्रीवादळचा परिणाम होऊ शकतो. छत्तीसगडला देखील हवामान विभागाने येलो अलर्ट दिला आहे. तर ओडीशाला देखील रेड अलर्ट देण्यात आला आहे. ५० हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आल असून आता राज्यातील ११ जिल्ह्यांना इशारा देण्यात आला आहे. ओडीशाच्या गंजाम, गजपती, कंधमाल, रायगड, कोरापुट, रायगडा, कालाहांडी, बौध, पुरी, नयागढ आणि खुर्दा या जिल्ह्यांना अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर काही जिल्ह्यांमध्ये शाळा तीन दिवस बंद ठेवण्यात आल्या आहेत.
ओडीशा येथील पुरी आणि आंध्रप्रदेशच्या येथील नरसापुरच्या किनारपट्टीवरचक्रीवादळ हे २० तारखेला दुपारी दाखल होवू शकतं. ओडीशाचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांनी बुधवारी सांगितले की, राज्य सरकार ही परिस्थिति पूर्णपणे हाताळण्यासाठी सज्ज आहे. त्यांनी आवश्यक उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे.