अधिवेशनात फुटाळा म्युझिकल फाउंटन सुरू होणार?

नागपूरकरांना पुन्हा अनुभवता येणार संगीताच्या तालावर नाचणारे कारंजे!

    दिनांक :19-Nov-2026
Total Views |
नागपूर, 
futala-musical-fountain-reopen नागपूर शहराच्या प्रमुख आकर्षणांपैकी एक असलेल्या फुटाळा तलावावरील म्युझिकल फाउंटन पुन्हा सुरू होण्याचे संकेत मिळत आहेत. तांत्रिक अडचणींमुळे गेल्या अनेक दिवसांपासून बंद असलेल्या या फाउंटनची दुरुस्ती करण्यात आली असून, गेल्या काही दिवसांपासून त्याच्या रंगीत तालमीला सुरुवात झाली आहे. गाण्यांच्या तालावर आकर्षक रोषणाईसह उंच उडणारे कारंजे पाहून तलावावर येणाऱ्या नागरिकांना सुखद अनुभव मिळत आहे.
दररोज हजारोंच्या संख्येने नागरिक फुटाळा तलाव परिसरात मनोरंजनासाठी येतात. त्यामुळे म्युझिकल फाउंटन पुन्हा सुरू झाल्यास पर्यटनाच्या आकर्षणात आणखी भर पडणार आहे.
 
 
F1
                                                                                   
                                                                      
 
 
 
दरम्यान, नागपूर येथे ७ ते १८ डिसेंबर २०२६ या कालावधीत राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन आयोजित करण्यात येणार आहे. या काळात राज्यातील मंत्री, आमदार आणि वरिष्ठ अधिकारी नागपुरात उपस्थित राहणार असल्याने अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवरच फुटाळा म्युझिकल फाउंटन सुरू केले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मात्र, हे फाउंटन केवळ अधिवेशनापुरते सुरू न ठेवता वर्षभर नियमितपणे सुरू ठेवावे, अशी अपेक्षा नागपूरकर नागरिकांकडून व्यक्त होत आहे.