सोन्याचा भाव १.२५ की पुन्हा उसळी?

    दिनांक :19-Nov-2026
Total Views |
मुंबई,
gold-price-drop-indiaसोन्याच्या दरात झालेल्या घसरणीमुळे सर्वसामान्य ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. मागील काही दिवसात सोन्याच्या दरात चांगलीच घसरण झाली आहे. जानेवारीतील विक्रमी उच्चांकी दराच्या तुलनेत सोनं जवळपास ३० टक्के स्वस्त झालं आहे. आता लग्नसराई सुरू होणार असून सामान्यांचे लक्ष सोन्याच्या दराकडे लागले आहे.
 

gold drope 
सध्या सोन्याचे दर
खाली येत असल्याने प्रति १० ग्रॅमचा भाव १.२५ लाख रुपयांपर्यंत घसरणार का, असा प्रश्न ग्राहकांच्या मनात उपस्थित होत आहे.
सध्याच्या दरानुसार दिल्ली सराफा बाजारात २४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १,३१,०८३ रुपयांच्या आसपास आहे. तर २२ कॅरेट सोन्याचा दर सुमारे १,२०,०७२ रुपये आणि १८ कॅरेट सोन्याचा दर ९८,३१२ रुपये प्रति १० ग्रॅम इतका नोंदवला गेला आहे. स्थानिक ज्वेलर्सकडे जीएसटी आणि मेकिंग चार्जेस जोडल्यानंतर या दरांमध्ये काहीसा फरक दिसून येऊ शकतो.?
जेम अँड ज्वेलरी एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिलचे चेअरमन किरीट भन्साली यांच्या मते, आगामी एका तिमाहीत सोने आणि चांदीच्या दरात मोठी तेजी येण्याची शक्यता कमी आहे. गुंतवणूकदार सोन्यातील गुंतवणूक काढून अमेरिकी ट्रेझरी आणि बॉन्ड्समध्ये पैसा गुंतवत असल्याने दरांवर दबाव आला आहे. याशिवाय नफावसुली आणि बदलत्या भू-राजकीय परिस्थितीचाही बाजारावर परिणाम होत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोने ३,५०० डॉलरपर्यंत खाली येऊ शकते, असा अंदाज भन्साली यांनी व्यक्त केला आहे. मात्र, भारतीय बाजारात सोने १.२५ लाख रुपयांपर्यंतच येईल, असे कोणतेही निश्चित लक्ष्य त्यांनी दिलेले नाही; त्यामुळे या पातळीपर्यंत घसरण होण्याची कोणतीही हमी नाही.