तुळशीच्या लग्नाचा थाट, जेवणावळी अन् वरात!

    दिनांक :19-Nov-2026
Total Views |
नागपूर,
vivah complete तरुण भारतच्या सामूहिक तुळशी विवाह आयोजनाच्या आवाहनाला उदंड प्रतिसाद मिळाला. विदर्भाच्या सर्व जिल्ह्यांमध्ये मंदीर स्वच्छता अभियानानंतर मोठ्या प्रमाणावर तुळशी विवाहाचे सोहळे आयोजिण्यात आले. पारंपरिक पद्धतीने पत्रिका छापण्यापासून बॅण्ड लावून, लोकांनी तुळस-केशव विवाहाचे आयोजन करून, सामाजिक एकात्मतेचा नवा मापदंड प्रस्थापित केला. जाती-पंथाच्या पलिकडे जाऊन समाजाच्या सर्व स्तरातील लोकांनी विशषत: महिला आणि विद्यार्थ्यांनी या आयोजनांमध्ये सक्रीय सहभाग घेतला. काही ठिकाणी हौशी मंडळींनी चैतन्यमयी वातावरणात श्रीकृष्ण-तुळशीची वरातही काढली.
 

तुळशीच्या लग्नाचा थाट 
 
गोंदीयाच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यामध्ये ५ हजारांवर वऱ्हाड्यांच्या उपस्थितीत प्रशासन आणि नागरिकांच्या सहकार्यातून तुळशीचा सामूहिक विवाह समारंभ आयोजित केला. दहीकाला आणि महाप्रसादानंतर घोडा-बॅण्डसह वरात काढण्यात आली. तर, गोरेगाव तालुक्यामध्ये लहानमोठ्या प्रमाणात ४० ठिकणी सामूहिक तुळशी विवाह साजरे झाले. वर्धा जिल्ह्यातील पुलगाव नजिक नाचणगावात विठ्ठल-रुक्मिणी मंदीरात वारकरी वेशभूूषेत शेकडो वऱ्हाडी सहभागी झाले. हुंडामुक्त विवाहसंस्थेविषयी जनजागृती करून, ‘आम्ही हुंडा दिला नाही, आम्ही हुंडा घेतला नाही’ असा गजर करून, सामाजिक भान जागविण्यात आले. कार्तिक महिन्यातील प्रबोधिनी एकादशी ते कार्तिकी पौर्णिमेदरम्यान, विदर्भाच्या सर्व ११ जिल्ह्यांमधील १२० तालुके आणि ४५० गावांमध्ये १० हजारांवर तुळशी विवाह सोहळ्यांचे आयोजन करण्यात आले, हे विशेष!
या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे दरवर्षी १०८ तुळशी रोपांचे वाटप दाम्पत्याचा सत्कार करण्यात आला. सामूहिक तुळशी विवाह आयोजनाचा समारोप नागपूरला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत साजरा झाला. यावर्षीही वैदर्भियांनी आपापल्या गावात तुळशी विवाह सोहळ्यांचे आयोजन करावे. संस्कृती आणि परंपरा जपण्यासाठी पुढाकार घ्या. यावर्षीही तुमच्या घरी, अपार्टमेंट्समध्ये, मंदीर परिसरात, संस्थेच्या प्रांगणात तुळशी विवाह सोहळ्यांचे आयोजन गावात-शहरात आपापल्या स्तरावर नक्की करा, ही हक्काची आग्रही विनंती! आपली संस्कृती जपण्याच्या दिशेने सुरू झालेली वाटचाल थांबता कामा नये. यावर्षीही तुळशी विवाह सोहळ्यांचे आवर्जून आयोजन करा. चला तर लागा तयारीला आणि वाजू द्या सनई-चौघडे!
असा करा तुळशी विवाह !
तरुण भारत आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शताब्दी व श्री नरकेसरी प्रकाशन संस्थेचे अमृतमहोत्सवी वर्ष असा ‘अमृतयोग’ साधून, वर्ष २०२५ मध्ये तरुण भारताच्या वतीने, ‘तुळस जगवा-पर्यावरण वाचवा’ हे अभियान राबविण्यात आले.vivah complete तुळशी विवाह कसा करावा? हे समजण्यासाठी तरुण भारतने या विवाह सोहळ्याचे संपूर्ण चित्रण करून, युट्यूबवर व्हिडीओ अपलोड केला आहे. सोबत दिलेला क्यु आर कोड स्कॅन करून, आपणही संपूर्ण विधी समजून घेऊ शकता. येत्या शनिवारी २१ नोव्हेंबर रोजी तुळशी विवाह सोहळ्याचे नियोजन करा आणि युवा पिढीला आपल्या संस्कार आणि संस्कृतीचा वसा सुपूर्द करा.