GTA 6 लॉन्च होताच PM मोदींची 'ही' पोस्ट व्हायरल

    दिनांक :19-Nov-2026
Total Views |
gta-6-launch-indiaगेमिंग विश्वातील सर्वात मोठा गेम GTA 6 आजपासून PS5 आणि Xbox वर लॉन्च झाला असून त्याची भारतातील किंमत 5,999 पासून सुरू होते. गेम लॉन्च होताच पंतप्रधान नरेंद्र मोदींची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली आहे. तसेच या जागतिक दर्जाच्या गेमचे ओपन-वर्ल्ड डिझाइन करण्यात बेंगळुरू कनेक्शन महत्त्वाचे ठरले आहे.
 

GTA6 
तब्बल 13 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर Rockstar Games ने बहुचर्चित GTA 6 हा गेम अखेर लॉन्च केला आहे. सप्टेंबर 2013 मध्ये आलेल्या GTA 5 नंतर आता आज 19 नोव्हेंबर 2026 रोजी हा गेम बाजारात उतरला असून, लॉन्च होताच पंतप्रधान नरेंद्र मोदींची पोस्ट आणि या गेमचेभारतीय 'बेंगळुरू कनेक्शन' तुफान व्हायरल झाले आहे.
पंतप्रधान मोदींनी X आणि इन्स्टाग्रामवर GTA गेमच्या स्टाईलमध्ये ग्राफिक्स शेअर करत "India is playing a whole new game!" असे कॅप्शन दिले आहे.
13 वर्षांचा टेक प्रवास: 2013 (GTA 5) ते 2026 (GTA 6) या काळात भारतातील बदललेले तंत्रज्ञान त्यांनी आकडेवारीसह दाखवले आहे.
स्वस्त डेटा आणि डिजिटल क्रांती: 2013 मध्ये 308 प्रति GB असलेला डेटा आज 7.51 वर कसा आला, यासोबतच UPI आणि अंतराळ क्षेत्रातील भारताची झेप या पोस्टमधून मांडली आहे.