शेकोटीजवळ बसलेल्यांना ट्रकने चिरडले

तिघांचा मृत्यू, दोघे गंभीर

    दिनांक :19-Nov-2026
Total Views |
जबलपूर,
jabalpur-truck-accident-3-killedरस्त्याच्या कडेला शेकोटीजवळ बसलेल्या लोकांना भरधाव ट्रकने चिरडले. यात तिघांचा मृत्यू झाला तर, दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना मध्यप्रदेशातील जबलपूर जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गावर राज फॅमिली ढाब्याजवळ गुरुवारी पहाटे घडली़ पाेलिसांनुसार, गुरुवारी पहाटे दारूच्या दुकानाचे कर्मचारी, ढाब्याचे मालक आणि त्यांचे कर्मचारी थंडीमुळे रस्त्याच्या कडेला शेकोटी पेटवून उब घेत होते़ त्याचवेळी भरधाव येणारा ट्रक अनियंत्रित होऊन महामार्गावरून बाजूला गेला.

jabalpur acci
 
ट्रकने आधी ढाब्यासमोर उभ्या असलेल्या बोलेरो, एक कार आणि एका पिकअपला धडक दिली, त्यानंतर शेकोटीजवळ बसलेल्या लोकांना चिरडले. त्यानंतर ट्रक नंतर उलटला. यात बलराम, मोनू आणि धर्मेंद्र या कर्मचाऱ्यांचा जागीच मृत्यू झाला. तर ढाबामालक राजा साहू आणि एक कर्मचारी गंभीर जखमी झाला़ दोघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. याप्रकरणी पोलिसांनी फरार ट्रकचालकाविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे़