राज्यातील मेट्रो स्थानकांची नावं बदलणार?

मुंबई, पुणे आणि नागपूरचा समावेश

    दिनांक :19-Nov-2026
Total Views |
मुंबई,
maharashtra-metro-station-renamingमहाराष्ट्र शासनाने राज्यातील मेट्रो स्थानकांच्या नामकरण आणि नामांतरासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. राज्यातील मेट्रो स्थानकांच्या नामकरण आणि नामांतरासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे समितीचे अध्यक्ष असतील, तर नगरविकास विभागाचे उपमुख्यमंत्री सह-अध्यक्ष म्हणून काम पाहणार आहेत.
 

metro renaming 
याशिवाय संबंधित भागातील खासदार, आमदार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी समितीचे सदस्य असतील. तसेच मेट्रो प्रकल्प राबवणाऱ्या संस्थेचे प्रशासकीय प्रमुख सदस्य सचिव म्हणून काम पाहणार आहेत. यावेळी मुंबई, पुणे आणि नागपूरमधील मेट्रो स्थानकांच्या नावांचा समिती आढावा घेणार असून, कोणत्या स्थानकांची नावं बदलण्याचा विचार होणार आहे. त्यामुळे आता राज्यातील मेट्रो स्थानकांच्या नामकरणाबाबत समिती कोणत्या शिफारशी करते, याकडे लक्ष लागले आहे.
सांस्कृतिक वारसा, ऐतिहासिक आणि भौगोलिक महत्त्व विचारात घेणार.
स्थानिक जनता आणि भावनांचा आदर राखला जाणार.
नाव उच्चारण्यास सोपे आणि भौगोलिक स्थानाशी सुसंगत असणे आवश्यक.
समान किंवा एकसारख्या नावांमुळे होणारा गोंधळ टाळणार.
राजकीय किंवा धार्मिक वाद टाळून प्रतीकात्मक प्रतिनिधित्वाचा समतोल राखणार.
मेट्रो व्यवस्थापन संस्था नामकरणाबाबतचा प्रस्ताव राज्य सरकारकडे सादर करणार.
नगरविकास विभागामार्फत प्रस्ताव समितीसमोर ठेवला जाणार.
समिती नामकरण किंवा पुनर्नामकरणाबाबत केंद्र सरकारला शिफारस करणार.
अंतिम प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला जाणार.