मानोरा,
wardha nanded railway line वर्धा-यवतमाळ - नांदेड या महत्त्वाकांक्षी रेल्वेमार्गाच्या कामाला वेग आला असून, वाशीम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यात रेल्वे रुळ अंथरण्याचे काम पूर्ण झाले आहे. गादेगाव शिवारातून सुरू झालेले हे काम सावळी शिवारमार्गे दिग्रस तालुक्यापर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे विदर्भ आणि मराठवाड्याला जोडणार्या या रेल्वेमार्गातील वाशीम जिल्ह्याच्या टप्प्याने महत्त्वपूर्ण प्रगती साधली आहे.
वर्धा - यवतमाळ-नांदेड रेल्वेमार्गाची एकूण लांबी २८४ किलोमीटर असून, या प्रकल्पासाठी ५ हजार २४८ कोटी रुपयांचा खर्च मंजूर आहे. वर्धा ते देवळी -कळंब दरम्यानचा ३८ किलोमीटरचा टप्पा रेल्वे वाहतुकीसाठी कार्यान्वित झाला आहे. उर्वरित मार्गावर विविध कामे सुरू आहेत. त्यामध्ये रेल्वे रूळ अंथरणे, पूल उभारणी आणि अन्य पायाभूत सुविधांच्या कामांचा समावेश आहे. मानोरा तालुयातील पटरीचे काम पूर्ण झाल्याने प्रकल्पाच्या पुढील टप्प्याला चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
प्रवासासह कृषी व्यापारालाही चालना
या रेल्वेमार्गामुळे वाशीम, यवतमाळ आणि मराठवाड्यातील नागरिकांना दळणवळणाचा नवा पर्याय उपलब्ध होणार आहे. विशेषतः मानोरा तालुयातील ग्रामीण भागाला रेल्वे संपर्काचा लाभ मिळण्याची अपेक्षा आहे.कापूस, सोयाबीन आणि इतर कृषी उत्पादनांची वाहतूक सुलभ होण्यासह शेतमाल मोठ्या बाजारपेठांपर्यंत पोहोचविणे सोयीचे होऊ शकते. विद्यार्थ्यांना, व्यापार्यांना आणि नोकरी-व्यवसायानिमित्त प्रवास करणार्यांनाही या मार्गाचा फायदा होणार आहे.wardha nanded railway line विदर्भातून मराठवाड्याकडे जाण्यासाठी रेल्वेचा पर्याय उपलब्ध झाल्यास रस्ते वाहतुकीवरील अवलंबित्वही कमी होण्यास मदत होईल.
चौकट...
दिग्रस-पुसद-उमरखेड परिसरातील डोंगराळ भागात बोगदे आणि मोठ्या पुलांची कामेही सुरू आहेत. त्यामुळे हा प्रकल्प केवळ रेल्वे पटरी अंथरण्यापुरता मर्यादित नसून, संपूर्ण मार्गावरील पूरक पायाभूत सुविधा उभारण्याचे मोठे आव्हान आहे.