रिसोड,
action against a plastic seller महाराष्ट्र शासनाच्या प्लास्टिक बंदी धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आणि रिसोड शहर प्लास्टिकमुक्त व स्वच्छ ठेवण्यासाठी नगर परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत शहरात विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान प्रतिबंधित प्लास्टिक पिशव्या व साहित्य बाळगणार्या तसेच विक्री करणार्या आस्थापनांवर कठोर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
आरोग्य विभागाच्या पथकाने शहरातील एकूण २५ दुकानांची कसून तपासणी केली. या तपासणीमध्ये नियमभंग करणार्या ४ आस्थापनांवर प्रत्येकी ५०० रुपये प्रमाणे एकूण २ हजार रुपये दंडात्मक कारवाई करण्यात येऊन तो निधी नगर परिषद तिजोरीत जमा करण्यात आला. तसेच या कारवाईदरम्यान संबंधित दुकानामधून एकूण २० किलो प्रतिबंधित प्लास्टिक जप्त करण्यात आले आहे.यापुढेही नगर परिषदेतर्फे अशीच धडक मोहीम सुरू राहणार असून, दुकानदारांनी व नागरिकांनी प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर टाळावा आणि पर्यावरणाच्या रक्षणासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.action against a plastic sellerया कारवाईत आरोग्य निरीक्षक रोहित बढेल, शिवाजी शेलार, निरज नकवाल, शेख जमील, संतोष क्षीरसागर, रितीक नकवाल, आदित्य खंडारे यांनी केली