अंबाझरी नाल्यात भरधाव कार कोसळली; भीषण अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू, कारचा चुराडा

पहाटे चारच्या सुमारास दुर्घटना; पुलाचे कठडे तोडून कार थेट नाल्यात, अंबाझरी पोलिसांकडून तपास सुरू

    दिनांक :19-Nov-2026
Total Views |

नागपूर,
nagpur-ambazari-car-accident-one-deadशहरातील अंबाझरी ते सुभाषनगर मार्गावर गुरुवारी (१९ नोव्हेंबर) पहाटे एक भीषण अपघात घडला. अंबाझरी तलावाच्या ओव्हरफ्लो पॉईंटजवळ भरधाव कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहन पुलाचे कठडे तोडून थेट अंबाझरी नाल्यात कोसळले. या दुर्घटनेत एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची तीव्रता इतकी भीषण होती की कारचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

car accident 
चालकाचे नियंत्रण सुटले अन् कार थेट नाल्यात
पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, गुरुवारी पहाटे सुमारे चार वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. अंबाझरी ओव्हरफ्लो पॉईंट परिसरातून भरधाव वेगाने जाणाऱ्या कारवरील चालकाचा ताबा अचानक सुटला. त्यानंतर कार पुलाच्या कठड्याला जोरदार धडक देत कठडे तोडून खाली नाल्यात कोसळली.धडकेची तीव्रता मोठी असल्याने कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या अपघातात जरीपटका परिसरातील रहिवासी असलेल्या तरुणाला डोक्याला, मानेला आणि हातांना गंभीर दुखापत झाली. या गंभीर जखमांमुळे त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
अंबाझरी पोलिसांकडून घटनास्थळी पाहणी
अपघाताची माहिती मिळताच अंबाझरी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून पुढील तपासाची प्रक्रिया सुरू केली. या दुर्घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची पुष्टी पोलिसांकडून करण्यात आली आहे. दरम्यान, अपघाताच्या वेळी कारमध्ये आणखी कोणी प्रवास करत होते का, चालकाचे नियंत्रण नेमके कोणत्या कारणामुळे सुटले आणि दुर्घटनेमागे अन्य काही कारण आहे का, याचा तपास पोलीस करीत आहेत. तपास पूर्ण झाल्यानंतर अपघाताचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.
अंबाझरी तलावाच्या ओव्हरफ्लो पॉईंटजवळ भरधाव कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहन पुलाचे कठडे तोडून थेट अंबाझरी नाल्यात कोसळले. या दुर्घटनेत एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेत जरीपटका येथील तरुणाचा जागीच मृत्यू.अंबाझरी पोलिसांकडून तपास सुरू