जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी विशेष बैठक घ्या

आ. धीरज लिंगाडे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

    दिनांक :19-Nov-2026
Total Views |
बुलढाणा,
ops-demand-maharashtraजुनी पेन्शन योजनेच्या मागणीसंदर्भात कर्मचारी संघटनांचे प्रतिनिधी व शासन यांच्यामध्ये सविस्तर चर्चा घडवून आणण्यासाठी विशेष बैठकीचे आयोजन करण्यात यावे अशी आग्रही मागणी अमरावती पदवीधर मतदार संघाचे आ. धीरज रामभाऊ लिंगाडे यांनी १८ नोव्हेंबर रोजी केली आहे.
 

fadanvis 
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या पत्रामध्ये नमूद केले आहे की, जुनी पेन्शन योजनेच्या मागणीसंदर्भात कर्मचारी संघटनांचे प्रतिनिधी व शासन यांच्यामध्ये सविस्तर चचर्चा घडवून आणण्यासाठी विशेष बैठकीचे आयोजन करणे आवश्यक आहे. तसेच, ३१ डिसेंबर पर्यंत कर्मचार्‍यांना विकल्प सादर करण्यासाठी देण्यात आलेल्या मुदतीमध्ये वाढ करण्यात यावी, जेणेकरून संबंधित कर्मचार्‍यांना आपला निर्णय घेण्यासाठी पुरेसा कालावधी मिळेल, अशी मागणीही स्वतंत्र पत्राद्वारे करण्यात आली.
आ. धीरज लिंगाडे यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन राज्यातील कर्मचार्‍यांच्या जिव्हाळ्याच्या असलेल्या जुनी पेन्शन योजनेच्या प्रश्नासंदर्भात महत्त्वपूर्ण निवेदन सादर केले.