ज्ञानगंगा अभयारण्यात धुरंधर पाठोपाठ रणवीर वाघ मोनाच्या सोबतीला दाखल

अभयारण्यात दोन नर एक मादीचे वास्तव्य

    दिनांक :19-Nov-2026
Total Views |

बुलढाणा,
ranveer-tiger-dnyangangaज्ञानगंगा अभयारण्यात वाघांच्या अधिवासासाठी वन्यजीव विभागाने केलेले प्रयत्न फळाला येत असल्याचे दिसून येत आहे. धुरंदर आणि मोना या जोडीला आवडलेल्या ज्ञानगंगा अभयारण्यात आता रणवीर या तिसर्‍या वाघाची एन्ट्री झाली असून ढ३-उ१ ज्याला वॉकर-२ असे वनशास्त्रीय नांव आहे. तो रणवीर वाघ मागील पाच वर्षापासून टिपेश्वर मधून फरार आहे. तिन आठवड्या पूर्वी तो ज्ञानगंगा अभयारण्यात पोहोचला आहे.
 

buldana vagh 
यापूर्वी रणवीर संभाजी नगर परिसरातील कन्नड वन परीक्षेत्रात होता. प्रसिद्ध महानुभाव पंथ जाळीचा देव जंगलात हा वाघ दिसल्याचे सांगण्यात येते. त्याच अजिंठा मार्गे जंगल भागातून तो ज्ञानगंगा अभयारण्यात पोहोचला असावा असा अंदाज वन्यजीव अधिकार्‍यांनी व्यक्त केला आहे. ज्ञानगंगा अभयारण्यमध्ये एकूण ७ वाघ अधिवास करू शकतील, एवढे वन्यक्षेत्र विकसित आहे. प्रारंभी येथे धुरंदर वाघ वय साधारण साडे चार वर्ष झाली त्यानंतर त्याला सहजीवनाचा आधार म्हणून मोना वाघिण वय अडीच वर्ष ज्ञानगंगा अभयारण्यमध्ये दाखल झाली. या दोघांच्या भेटीचे फोटो सुद्धा वन्यजीव विभागाला प्राप्त झाले होते. आता त्यांच्या सोबतीला रणवीर वाघ वय पाच वर्ष दिसणार आहे.