शिवसेना (उबाठा) कडून शायना एन सी च्या कृत्याचा निषेध

    दिनांक :19-Nov-2026
Total Views |
मानोरा,
shiv-sena हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो फाडल्याच्या निषेधार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शहरातील झेंडा चौकात शिवसेना तालुकाप्रमुख रविंद्र पवार यांच्या नेतृत्वात शिवसैनिक व युवासेना सैनिकांनी तीव्र आंदोलन करून निषेध नोंदविला. याप्रसंगी मुख्य चौकात शिवसैनिकांनी एकत्र येत बॅनर हातात घेऊन जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी शायना एन सी यांच्या कृत्याचा तीव्र शब्दात निषेध करण्यात केला. बाळासाहेब ठाकरे हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत असून, त्यांच्या प्रतिमेचा अवमान करणारे कृत्य शिवसैनिक कदापि सहन करणार नाहीत, असा इशारा यावेळी पदाधिकार्‍यांनी दिला.
 
 
shiv-sena
 
बाळासाहेबांच्या विचारावर आणि हिंदुत्वाच्या मुद्यावर राजकारण करायचे आणि दुसरीकडे त्यांच्याच फोटोचा अवमान करायचा, हा दुटप्पीपणा असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. अशा कृत्य करणार्‍यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. जोपर्यंत माफी मागितली जात नाही, तोपर्यंत शिवसेना स्वस्थ बसणार नाही, असा आक्रमक पवित्रा कार्यकर्त्यांनी घेतला.
 
 
यावेळी युवा सेनेचे जिल्हा समन्वयक श्याम राठोड, शहर अध्यक्ष संतोष पुरी, उपतालुकाप्रमुख अजय देशमुख, सुभाष गोंधळेकर, शेतकरी सेना तालुकाप्रमुख संदीप ढाकुलकर, शहर समन्वयक उप तालुकाप्रमुख रोहित डोलारकर, सर्कल प्रमुख अशोक ठाकरे, सर्कल प्रमुख संजय लोंढे, उपसरपंच राजू आंबुरकर, घनश्याम मासवतकर, वैजनाथ ढोक, उपसरपंच गोपाल चांदोळे, भीमराव राठोड, गणेश पवार, सुरेश जाधव, अमोल पवार सह पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.