पत्रकारितेच्या नावावर खंडणीच्या तपासासाठी ‘एसआयटी’ स्थापन

चारही महिलांना २१ नोव्हेंबरपर्यंत कोठडी

    दिनांक :19-Nov-2026
Total Views |

अनिल कांबळे

नागपूर,

extortion in the name of journalism वृत्तपत्रात जाहिरात न दिल्यास विरोधात बातमी छापण्याची धमकी देऊन आठ राज्यांतील सरपंचाना कोट्यवधीने गंडा घातल्या प्रकरणाची व्याप्ती वाढली आहे. त्यामुळे आयपीएस अधिकाऱ्याच्या नेतृत्वात विशेष तपास पथक ‘एसआयटी’ स्थापन करण्यात आले आहे. या टोळीची मास्टरमाईंडसह चौघींना २१ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे नेमक्या किती कोटींची फसवणूक आतापर्यंत या महिला टोळीने केली, याचा खुलासा होणार आहे.

 
 
extortion in the name of journalism
 
 

पत्रकारितेच्या नावाचा गैरवापर करून देशातील आठ राज्यांतील सरपंचांना लक्ष्य करीत खंडणी उकळण्याचा प्रकार नागपूर ग्रामीण पोलिसांनी उघडकीस आणला आहे. ‘दैनिक श्रेष्ठ न्यूज’च्या नावाखाली सरपंचांना फोन करून जाहिरातीसाठी पैशांची मागणी करणे, पैसे न दिल्यास ग्रामपंचायतीतील कथित गैरव्यवहार प्रसिद्ध करून बदनामी करण्याची धमकी देणे, अशा पद्धतीने ही टोळी कार्यरत होती. मोनिका लालसिंग सूर्यवंशी (२८, रा. बगची, छतरी चौराहा, नरसिंहगढ, जि. राजगढ मध्यप्रदेश), नेहा लालसिंग सूर्यवंशी (२३), अक्षरा मिलिंद अरक (२१, रा. हुजूर, भोपाळ) आणि कोमल मोहन मोरे (२३, रा. अन्नानगर, भोपाळ) या चार महिलांनी तोतया पत्रकारितेचा गोरखधंदा सुरु केला होता.extortion in the name of journalism मध्यप्रदेश राज्यातील सरपंचांना लुटल्यानंतर त्यांनी महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, हिमाचल प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड या राज्यातील सरपंचांना धमकी देऊन जाहिरातीच्या नावे खंडणी उकळली आहे. या टोळीने या आठ राज्यासह अन्य राज्यातही आपला गोरखधंदा सुरु केला होता, त्यामुळे या तपासाची व्याप्ती मोठी असल्यामुळे पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार आणि अप्पर पोलिस अधीक्षक अनिल म्हस्के यांनी एसआयटी स्थापन केली आहे. एसआयटीचे प्रमुख म्हणून डीवायएसपी शशांत एन.एम.तर तपास अधिकारी म्हणून एपीआय मंगला मोकाशे यांचा समावेश आहे.