गेटमनच्या सतर्कतेमुळे टळला मोठा अनर्थ
तिरूपत्तर,
7 railway coaches, without an engine तामिळनाडू येथील तिरूपत्तर जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. रेल्वेच्या सुरक्षितेतील निष्काळजीपणा पुन्हा एकदा समोर आले आहे. जोलारपेट्टई रेल्वे जंक्शनच्या यार्डमध्ये ना इंजिन ना चालक तरीही धावले 7 डब्बे. गेटमनच्या सतर्कतेमुळे टळला मोठा अनर्थ. तब्बल 6 किलोमीटर अंतर पार केल्यानंतर हे डब्बे तामलेरी मुथुर परिसरात रुळावरून घसरले. परंतु, सुदैवाने गेटमनच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली.

या घटनेमुळे बंगळुरू आणि चेन्नई येथील रेल्वेसेवा विस्कळीत झाली आहे. पुढील संभाव्य अपघात टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने बंगळुरूकडून जोलारपेट्टईच्या दिशेने येणाऱ्या गाड्या थांबवल्या आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार, हे 7 डब्बे कोच मेंटेनन्स यार्ड मध्ये दुरुस्तीच्या कामासाठी उभे करण्यात आले होते. एका इंजिनने या डब्ब्यांना पुढे ढकलण्यात आले होते. मात्र, कर्मचाऱ्यांनी हे डब्बे सुरक्षितपणे लॉक केले नाहीत किंवा त्यावर योग्य ते नियंत्रण ठेवले नाही. त्यामुळे इंजिन वेगळे होताच हे डब्बे उताराच्या दिशेने आपोआप धावू लागले. धावत- धावत सुमारे ६ किमी हे डब्बे पुढे गेले. शेवटी तामलेरी मुथुर परिसरात हे डब्बे रुळावरून खाली घसरले.
सदर घटनेची माहिती रेल्वे प्रशासनाला मिळताच, घटनास्थळी रेल्वे कर्मचारी दाखल होऊन मुख्य मार्गावरून घसरलेले डब्बे हटवण्याचे काम सुरु करण्यात आले. डब्ब्यांना एकमेकांपासून वेगळं करण्यासाठी गॅस- कटिंग उपकरणांचा वापर करण्यात आला. तर डब्ब्यांना रेल्वे मार्गावरून बाजूला करण्यासाठी जेसीबी यंत्रणेची मदत घेण्यात आली. या घटनेमुळे बंगळुरू आणि चेन्नई येथील मुख्य रेल्वे मार्गावरील वाहतूक काही काळ पूर्णपणे ठप्प झाली होती. त्यामुळे अनेक महत्वाच्या गाड्या उशिराने धावत असल्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल झाले.